आता त्याच्या देखील लक्षात राहील तिने ‘अमुक’ दिवशी काय म्हटलं होतं; WhatsApp चं हे फीचर येईल कामी

इंस्टंट मेसेज शेयरिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येतं. यासाठी कंपनीनं आता एक नवीन फीचर रोलआउट केलं आहे. प्लॅटफॉर्मनं जुने मेसेज सहज सर्च करता यावेत म्हणून एक नवीन आणि शानदार फीचर सादर केलं आहे. Search WhatsApp messages by date नावाच्या या फीचरच्या मदतीनं युजर्स जुने मेसेज शोधू शकता. म्हणजे जेव्हा युजर्स चॅटमध्ये तारीख टाकतील तेव्हा त्यांना जुने मेसेज दिसू लागतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या सर्च बार मध्ये कॅलेंडरची सर्व्हिस मिळेल. चला जाणून घेऊया, कसं वापरता येईल नवीन फीचर.

आलं सर्च बाय डेट फीचर

Search WhatsApp messages by date आता अँड्रॉइड डिवाइसवर उपलब्ध झालं आहे आणि आयओएस, मॅक डेस्कटॉप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर हे आधीपासूनच उपलब्ध होतं. चला जाणून घेऊया हे फिचर कसं वापरायचं.
हे देखील वाचा: ९९ टक्के लोकांना माहीतच नाहीत WhatsApp वरील या ट्रिक्स; हटके पद्धतीनं मेसेज फॉरमॅट करून दाखवा तुमची स्टाइल

सर्च बाय डेट फीचर कसं वापरायचं?

  • तुमच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर ज्या चॅटमध्ये सर्च करायचं आहे ते चॅट ओपन करा.
  • जर तुम्हाला एखाद्या ठराविक तारखेला आलेला किंवा पाठवलेला मेसेज सर्च करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या उजवीकडे कॅलेंडर आयकॉन दिसेल.
  • कॅलेंडर आयकॉनवर टॅप केल्यावर एक डेट सिलेक्शन टूल दिसेल.
  • आता तुम्हाला ज्या तारखेचा मेसेज शोधायचा आहे ती तारीख, महिना आणि वर्ष यांची निवड करा.

टेक्स्ट फॉरमॅटिंग झालं सोपं

व्हॉट्सअ‍ॅपनं मेसेजिंगसाठी चार नवीन टेक्स्ट फॉर्मेट ऑप्शन सादर केले आहेत. टेक्स्ट फॉर्मेटिंगचे हे लेटेस्ट अ‍ॅडिशन युजर्सना अनेक प्रकारच्या मेसेजिंगमध्ये फायदा देतील. यांच्या मदतीनं मेसेज अधिक चांगल्या प्रकारे सादर करता येईल. तसेच वेळ वाचवण्यास देखील मदत करतील. तसेच मेसेजच्या माध्यमातून आता संवाद आधी चांगल्याप्रकारे करता येईल. बुलेट लिस्ट, नंबर्ड लिस्ट, ब्लॉक कोट्स आणि इनलाइन कोड तुमचा टेक्स्ट मेसेजिंग एक्सपीरियंस कशाप्रकारे इम्प्रूव करतील.

बुलेटेड लिस्ट फॉर्मेटचा वापर करण्यासाठी “-” सिंबल नंतर नंतर स्पेस द्यावा लागेल. नंबर्ड लिस्ट फॉर्मेट वापरण्यासाठी युजरला 1, 2, 3… असे नंबर करावे लागतील त्यानंतर पूर्णविराम आणि मग स्पेस द्यावा लागेल. ब्लॉक कोट करण्यासाठी > चिन्ह टाइप करून त्यानंतर स्पेस द्यावा लागेल. इनलाइन कोड फॉरमॅटिंग वापरण्यासाठी युजर्सना शब्दाच्या सुरवातीला आणि शेवटी “`” हे चिन्ह स्पेसविना टाइप करावं लागेल.

Source link

WhatsAppwhatsapp search by datewhatsapp tipsWhatsApp updateव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप टिप्स
Comments (0)
Add Comment