Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आलं सर्च बाय डेट फीचर
Search WhatsApp messages by date आता अँड्रॉइड डिवाइसवर उपलब्ध झालं आहे आणि आयओएस, मॅक डेस्कटॉप आणि व्हॉट्सअॅप वेबवर हे आधीपासूनच उपलब्ध होतं. चला जाणून घेऊया हे फिचर कसं वापरायचं.
हे देखील वाचा:
सर्च बाय डेट फीचर कसं वापरायचं?
- तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- त्यानंतर ज्या चॅटमध्ये सर्च करायचं आहे ते चॅट ओपन करा.
- जर तुम्हाला एखाद्या ठराविक तारखेला आलेला किंवा पाठवलेला मेसेज सर्च करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या उजवीकडे कॅलेंडर आयकॉन दिसेल.
- कॅलेंडर आयकॉनवर टॅप केल्यावर एक डेट सिलेक्शन टूल दिसेल.
- आता तुम्हाला ज्या तारखेचा मेसेज शोधायचा आहे ती तारीख, महिना आणि वर्ष यांची निवड करा.
टेक्स्ट फॉरमॅटिंग झालं सोपं
व्हॉट्सअॅपनं मेसेजिंगसाठी चार नवीन टेक्स्ट फॉर्मेट ऑप्शन सादर केले आहेत. टेक्स्ट फॉर्मेटिंगचे हे लेटेस्ट अॅडिशन युजर्सना अनेक प्रकारच्या मेसेजिंगमध्ये फायदा देतील. यांच्या मदतीनं मेसेज अधिक चांगल्या प्रकारे सादर करता येईल. तसेच वेळ वाचवण्यास देखील मदत करतील. तसेच मेसेजच्या माध्यमातून आता संवाद आधी चांगल्याप्रकारे करता येईल. बुलेट लिस्ट, नंबर्ड लिस्ट, ब्लॉक कोट्स आणि इनलाइन कोड तुमचा टेक्स्ट मेसेजिंग एक्सपीरियंस कशाप्रकारे इम्प्रूव करतील.
बुलेटेड लिस्ट फॉर्मेटचा वापर करण्यासाठी “-” सिंबल नंतर नंतर स्पेस द्यावा लागेल. नंबर्ड लिस्ट फॉर्मेट वापरण्यासाठी युजरला 1, 2, 3… असे नंबर करावे लागतील त्यानंतर पूर्णविराम आणि मग स्पेस द्यावा लागेल. ब्लॉक कोट करण्यासाठी > चिन्ह टाइप करून त्यानंतर स्पेस द्यावा लागेल. इनलाइन कोड फॉरमॅटिंग वापरण्यासाठी युजर्सना शब्दाच्या सुरवातीला आणि शेवटी “`” हे चिन्ह स्पेसविना टाइप करावं लागेल.