Farmer Suicide: परभणीत अनंत चतुर्दशी दिवशीच तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

हायलाइट्स:

  • अनंत चतुर्दशी दिवशीच तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
  • शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला.
  • कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले.

परभणी:अनंत चतुर्दशी दिवशी परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माधव रघुनाथराव देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुण शेतकऱ्याने शेतात चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( Parbhani Farmer Suicide Latest News )

वाचा: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

मयत शेतकरी माधव देशमुख याच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचे एक लाखाचे कर्ज होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे कसे या विवंचनेत माधव हा होता आणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने पेडगाव सह परिसरात शोककळा पसरली आहे.

वाचा: गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Source link

farmer madhav deshmukh suicidefarmer suicide latest newsparbhani farmer suicideparbhani farmer suicide latest newsparbhani farmer suicide updatesअनंत चतुर्दशीपरभणीमहाराष्ट्र ग्रामीण बँकमाधव रघुनाथराव देशमुखशेतकरी
Comments (0)
Add Comment