हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन करत चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला होता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे व बिनबुडाचे असून त्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सूत्रधार आहेत. चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कोणामुळं झालं?, असा सवाल करतानाच चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मी म्हणालो, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. त्याबद्दल बोलताना फडणवीसांनी मिश्कील टोला लगावला आहे.
‘सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपचं षडयंत्र; चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड’
हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा प्रसारमाध्यमांनी सवाल करताना ‘असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
‘मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची फडणवीस- चंद्रकांत पाटलांची सूचना’
तसंच, किरीट सोमय्यांच्या झालेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री कार्यलयाला माहिती नसल्याचं समोर येतंय. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. या संदर्भात तेच दोन पक्ष सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि गृहमंत्रालयाने ऑर्डर दिली असेल असं असू शकते. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये दखल घेऊन कशी कारवाई थांबवली पाहिजे होती, ही चुकीची कारवाई चालु आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
वाचाः राष्ट्रवादी विरुद्ध सोमय्या संघर्ष तूर्तास टळला; काय घडलं नेमकं?