सोशल मीडियावर निखिल चावला यांनी एका पोस्टशेअर केली आहे त्यात त्या म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी स्विगीकडून जेवण ऑर्डर केले होते, पण डिलिव्हरी वेळेवर न मिळाल्याने ते निराश झाले आणि त्यांनी स्विगीच्या कस्टमर केअरला कॉल करण्याचा निर्णय घेतला. त्यांना गुगलवर “स्विगी कॉल सेंटर” चा नंबर सापडला. त्यांनी कॉल केला असता यापुढे सर्व घडले.
अशा प्रकारे झाली वृद्ध व्यक्तीची फसवणूक
निखिल यांच्या ६५ वर्षीय वडिलांनी बनावट कस्टमर केअर नंबरवर केला असता पहिल्याच वेळी त्यांची ३५ हजारांची आर्थिक फसवणूक झाली. हे लक्षात येताच वृद्ध व्यक्तीने पैसे परत मिळविण्यासाठी पुन्हा नंबरवर कॉल केला, परंतु पुन्हा एकदा क्रेडिट कार्ड तपशील देण्यास फसवले गेले. चावला यांनी पुढे असे सांगितले आहे की घोटाळेबाजांनी त्याच्या वडिलांचे सिम कॉपी केले आणि वडिलांचा प्रायव्हेट डेटा गोळा करण्यासाठी फोन क्लोन केला आणि 3 लाख रुपयांपेक्षा जास्त पैशांची आर्थिक फसवणूक केली.
स्विगीने हे उत्तर दिले
स्विगीने ट्विट करत या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. स्विगीने सांगितले की“हाय निखिल, आमच्या कॉलवर चर्चा केल्याप्रमाणे, स्विगीकडे कोणताही अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक नाही. कोणत्याही समस्यांसाठी, फक्त आमचे ॲप-मधील चॅट समर्थन वापरा. ते असेही सल्ला देतात की वापरकर्त्यांनी Google शोधांवर आढळलेल्या नंबरवर विश्वास ठेवू नये आणि त्याऐवजी, त्यांनी अधिकृत चॅनेल किंवा अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या माहितीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा”