बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; हायवेवरुन बसप्रवाशांना किडनॅप करुन झाडल्या गोळ्या, ११ जण ठार

वृत्तसंस्था, कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांत किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांतील नऊ जण हे पंजाब प्रांतातील आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे हल्ले कोणी घडवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनेक महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये अशांतता असून पाकिस्तानी नागरिक तसेच, सैनिकांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसला लक्ष्य केले. राष्ट्रीय महामार्गावरून क्वेट्टा येथून ताफ्तान येथे जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी रोखले व त्यातील प्रवाशांना बाहेर काढले व त्यांचे अपहरण केले. यानंतर यातील नऊ पुरुषांचे मृतदेह तेथून जवळ असणाऱ्या डोंगराळ प्रदेशात एका पुलाजवळ आढळले. त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मृत प्रवासी पंजाब प्रांतातील वझिराबाद, मंडी बहाउद्दिन आणि गुजरनवाला येथील आहेत.

अन्य एका दहशतवादी हल्ल्यात याच महामार्गावर एका कारवर गोळीबार करण्यात आला. यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी या हल्ल्यांचा निषेध केला व मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली. या दोन्ही घटनांतील हल्लेखोर दहशतवाद्यांना व त्यांच्या सूत्रधारांना माफ केले जाणार नाही, असे ते म्हणाले.
पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला हवे होते, २६/११ हल्ल्याबाबत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भूमिका
दोन सैनिक, एक दहशतवादी ठार

पेशावर : एका वॉण्टेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात पाकिस्तानी सैनिकांना शनिवारी यश आले. मात्र या चकमकीत दोन सैनिकांचाही मृत्यू झाला. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ही चकमक झाली. सलीम ऊर्फ रब्बानी नावाच्या दहशतवाद्यावर ५० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. रब्बानी या परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई केली. या चकमकीत रब्बानी ठार झाला व त्याचे दोन साथीादार जखमी झाले.

भाजपला घरपोच केल्याशिवाय गप्प बसणार नाही, शशिकांत शिंदे समर्थकांचा निर्धार

भूसुरूंगस्फोटात तीन मुले मृत्युमुखी

पेशावर : खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या भूसुरूंग स्फोटात शुक्रवारी किमान तीन मुलांचा मृत्यू झाला. दोन स्थानिक संघांमधील व्हॉलिबॉल सामना पाहण्यासाठी काही मुले जात असताना वझिरीस्तान जिल्ह्यातील वान्ना या आदिवासी क्षेत्रात ही दुर्घटना घडली. यातील एका मुलाचा सुरुंगावर पाय पडल्याने जोरदार स्फोट झाला. हा सुरूंग कोणी व का पेरला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Source link

baluchistan attackbaluchistan in pakBaluchistan terrorist attackpakistan policeSalim Rabbanishahbaz sharifTerrorists AttackTerrorists Attack In Pakistanदहशतवादी हल्ला
Comments (0)
Add Comment