आजचे पंचांग 18 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र २९, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल दशमी, गुरुवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०६, शव्वाल ०८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १८ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत.

दशमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, गंड योग मध्यरात्री १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, गर करण सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२०
  • सूर्यास्त: सायं. ६-५६
  • चंद्रोदय: दुपारी २-३३
  • चंद्रास्त: पहाटे ३-००
  • पूर्ण भरती: सकाळी ८-५७ पाण्याची उंची २.९० मीटर, रात्री ९-२० पाण्याची उंची ३.६१ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-०४ पाण्याची उंची २.०६ मीटर, दुपारी २-२८ पाण्याची उंची १.८३ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८
मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपासून ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे दहा गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ११ मिनिटे ते ११ वाजून ०३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ११ मिनिटांपासून ते ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – भगवान विष्णू यांच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि विष्णु चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

18 April 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment