भारतामध्ये १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर, द. कोरियामध्ये १० एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीस म्हणजे, ४ नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या देशांच्या निवडणुकींवर ‘एआय’द्वारे प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
या प्रकारच्या प्रचारामुळे निवडणुकीतल निकालास कलाटणी मिळण्याची शक्यता फार कमी असते. तरीही चीनकडून मिम्स, व्हिडीओ, ऑडिओ आदी माध्यमातून वाढते प्रयोग सुरूच राहण्याची शक्यता आहे व त्यात त्यांना यशही मिळू शकते, असेही वॅट्स म्हणाले. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आपल्याला अभिप्रेत असा लागावा, यासाठी चीनकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बनावट खाती निर्माण करण्यात आली असून मतदारांमध्ये फूट पाडण्याचे काम या खात्यांमार्फत केले जात आहे.
जगभरातही वापर
निवडणूक तोंडावर आलेल्या या तीन देशांतच नाही, तर जगभरात आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनकडून एआयचा निरंतर वापर केला जात आहे, असेही मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.