पॅलेस्टिनी मदत गट आणि मानवाधिकार संघटनांनी वारंवार इस्रायली सैन्याने नागरिकांवर बेपर्वाईने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, हा आरोप इस्रायलने नाकारला आहे.
‘ही एक शोकांतिका आहे. ही एक गंभीर घटना असून, त्याला आम्ही जबाबदार आहोत. ती घडायला नको होती. यापुढे ती पुन्हा कधीही घडणार नाही, याची आम्ही खात्री देतो,’ असे लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनिअल हॅगॅरी यांनी पत्रकारांना सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या लष्करी नियमांनुसार, लक्ष्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याकडून धोक्याची ओळखले होणे आवश्यक आहे.
याप्रकरणी एका कर्नल आणि मेजरला बडतर्फ करण्यात आले आहे, तर इतर तीन अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासाचे निष्कर्ष लष्कराच्या ‘ॲडव्होकेट जनरल’कडे सोपवण्यात आले आहेत. ते अधिकारी किंवा इतर कोणाला या हत्येमध्ये सामील असलेल्यांना शिक्षा करायची की खटला चालवायचा हे ठरवतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी आता केलेल्या कारवाईमुळे ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’च्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दलचा आंतरराष्ट्रीय संताप शांत होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’ ही एक ना-नफा आणि बिगरसरकारी संस्था आहे जी खाद्यपदार्थ पुरवते.