Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गाझामधील मदत कर्मचाऱ्यांवर ड्रोन हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई; इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

6

तेल अवीव: इस्रायली लष्कराने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तसेच गाझामधील ड्रोन हल्ल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या तीन जणांना फटकारले. या हल्ल्यामध्ये अन्न-वितरण मोहिमेवर असणारे सात मदत कर्मचारी मारले गेले. या अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीचा गैरवापर करून लष्कराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे लष्कराने म्हटले आहे.

पॅलेस्टिनी मदत गट आणि मानवाधिकार संघटनांनी वारंवार इस्रायली सैन्याने नागरिकांवर बेपर्वाईने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, हा आरोप इस्रायलने नाकारला आहे.

‘ही एक शोकांतिका आहे. ही एक गंभीर घटना असून, त्याला आम्ही जबाबदार आहोत. ती घडायला नको होती. यापुढे ती पुन्हा कधीही घडणार नाही, याची आम्ही खात्री देतो,’ असे लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनिअल हॅगॅरी यांनी पत्रकारांना सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या लष्करी नियमांनुसार, लक्ष्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याकडून धोक्याची ओळखले होणे आवश्यक आहे.

याप्रकरणी एका कर्नल आणि मेजरला बडतर्फ करण्यात आले आहे, तर इतर तीन अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासाचे निष्कर्ष लष्कराच्या ‘ॲडव्होकेट जनरल’कडे सोपवण्यात आले आहेत. ते अधिकारी किंवा इतर कोणाला या हत्येमध्ये सामील असलेल्यांना शिक्षा करायची की खटला चालवायचा हे ठरवतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी आता केलेल्या कारवाईमुळे ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’च्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दलचा आंतरराष्ट्रीय संताप शांत होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’ ही एक ना-नफा आणि बिगरसरकारी संस्था आहे जी खाद्यपदार्थ पुरवते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.