Xiaomi ने लाँच केले स्मार्ट गीझर; अँटीबॅक्टेरियल टेक्निक फीचरसह मोबाईलवरूनही होणार कंट्रोल

‘Mijia P1’ स्मार्ट गीझरमध्ये HyperOS उपलब्ध आहे, ज्याद्वारे ते स्मार्ट होम इकोसिस्टमशी सहजपणे कनेक्ट होते. युजर्स ॲपद्वारे स्मार्ट गीझर चालू किंवा बंद करू शकतात, तापमान सेट करू शकतात आणि प्री-हीटिंग शेड्यूल करू शकतात. यात एनर्जी सेव्हिंग मोड देखील आहे, जो स्मार्टपणे वीज वाचवण्याचा दावा करतो.

स्मार्ट गिझरची किंमत

चीनमध्ये Mijia 60L Dual-Tank Water Heater P1 ची किंमत 2,299 युआन (सुमारे 26,500 रुपये) आहे. गिझरसाठी ही निश्चितपणे प्रीमियम किंमत सीरीज आहे. गीझर प्री-सेल दरम्यान 1,999 युआन (अंदाजे 23,000 रुपये) च्या किमतीत उपलब्ध आहे.

Mijia चे फीचर्स

  • Mijia चे नवीन स्मार्ट गीझर अनेक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज आहे.
  • गीझर हायपरओएस द्वारे घरी Xiaomi इकोसिस्टमशी कनेक्ट होतो.
  • युजर्स ॲपद्वारे गीझरची विविध फंक्शन नियंत्रित करू शकतात, जसे की तापमान, हीटिंग शेड्यूल, पॉवर चालू/बंद किंवा एनर्जी सेव्हिंग मोड इ.
  • गीझर केवळ 700 मिमी रुंदीसह आकर्षक डिझाइनसह येतो.
  • यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे, जो काही महत्वाची माहिती दर्शवितो.
  • Mijia P1 ड्युअल-टँक सेपरेशन आणि 3300W हीटिंग पॉवरने सुसज्ज आहे. हे युजर्सना त्यांच्या गरजेनुसार सिंगल आणि ड्युअल टँकमध्ये स्विच करण्याचा पर्याय देते.
  • गिझरची एकूण क्षमता 60L आहे.
  • गिझरमध्ये एक विशेष तंत्रज्ञान आहे, जे ते आतून स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्यासाठी कार्य करते.
  • याशिवाय, कंपनीचा दावा आहे की, हे तंत्रज्ञान 99.9% अँटीबॅक्टेरियल रेट प्रोव्हाईड करते.

Mijia P1 9-लेयर सेफ्टी सिस्टम

Mijia P1 9-लेयर सेफ्टी सिस्टमसह येते, ज्यामध्ये अँटी-इलेक्ट्रिक वॉल, पॉवर-ऑफ संरक्षण, ड्राय-बर्निंग संरक्षण आणि उच्च तापमान संरक्षण समाविष्ट आहे.

Source link

mijia p1smart geezerXiaomiमिजिआ पी 1शाओमीस्मार्ट गीझर
Comments (0)
Add Comment