यूपीए सरकारच्या कार्यकाळात देश निराशेच्या गर्तेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली: ‘जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भारत आता आत्मविश्वासाने सत्य आणि अहिंसेचे मंत्र जागतिक स्तरावर मांडत असून त्यात आपली सांस्कृतिक प्रतिमाही मोठी भूमिका बजावत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. येथे आयोजित दोन हजार ५५०व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाला संबोधित करताना ते बोलत होते.
…पण ५० वर्षात काँग्रेसला राहुल गांधींना लॉन्च करणं नाही जमलं नाही, एकनाथ शिंदेंची जहरी टीका
‘यूपीए सरकारच्या कार्यकाळात देश निराशेच्या गर्तेत होता. मात्र सन २०१४मध्ये सत्तेत आलेल्या आमच्या सरकारने वारसा आणि भौतिक विकासाला चालना देण्यावर भर दिला,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देताना मोदी यांनी लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव सुरू असून भविष्यात एक नवीन प्रवास सुरू होईल, असा विश्वास संपूर्ण देशाला असल्याचे नमूद केले. मोदी यांनी यावेळी योग आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय वारशाचा प्रसारासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा दाखला देत देशाची नवी पिढी आता स्वाभिमान हीच आपली ओळख मानते, असे अधोरेखित केले.‘जगभरच्या समस्यांवर उपाय म्हणून भारताकडून सत्य आणि अहिंसेचे मंत्र जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने मांडले जात आहेत. भारताचे वाढते सामर्थ्य आणि परराष्ट्र धोरणामुळे भारतातूनच शांततेचा मार्ग दाखवला जाईल, अशी आशा जगाला आहे. भारताच्या सांस्कृतिक प्रतिमेनेही यात मोठी भूमिका निभावली आहे,’ असेही मोदी म्हणाले. जागतिक संघर्षादरम्यान तीर्थंकर, आध्यात्मिक जैन गुरूंच्या शिकवण अधिक समर्पक ठरतात, याचाही उल्लेख त्यांनी केला.

आमच्यावर कारवाई करण्याआधी मोदी, शाहांवर कारवाई करा; ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच ललकारलं

‘हा कार्यक्रम दुर्मिळ प्रसंगी होत असून हा अमृत काळाचा प्रारंभ आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाला सुवर्ण शताब्दी बनवण्याच्या दिशेने काम सुरू आहे. ‘अमृत काळा’चा विचार केवळ एक संकल्प नाही तर, भारताची आध्यात्मिक प्रेरणा आहे. भारत ही केवळ सर्वांत जुनी संस्कृती नाही तर मानवतेसाठी एक सुरक्षित आश्रयस्थानही आहे,’ असे सांगत ‘भगवान महावीरांचा शांततेचा, करुणेचा आणि बंधुत्वाचा संदेश हा सर्वांसाठी महान प्रेरणेचा स्रोत आहे,’ असे मोदी म्हणाले.

Source link

Lord Mahavir Nirvana FestivalNarendra Modi criticizesNarendra Modi on Congressनरेंद्र मोदी टीकानरेंद्र मोदी बातमीभगवान महावीर निर्वाण महोत्सव
Comments (0)
Add Comment