SOP for religious places: मंदिरे, धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार; पाहा, संपूर्ण नवी नियमावली!

हायलाइट्स:

  • ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा.
  • धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक- मुख्यमंत्री
  • राज्य सरकारकडून मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठी नवी नियमावली जाहीर.

मुंबई: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवरात्रीपासून, म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्याची घोषणा केली आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, मंदिरात किंवा धार्मिक स्थळावर जाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क असणे आवश्यक असून, सुरक्षित अंतर पाळणे, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे. यानंतर राज्य सरकारने मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठी नवी नियमावली देखील जाहीर केली आहे. (new guidelines state govt issues new sop on preventive measures to contain spread of corona in religious places)

अशी आहे नवी नियमावली

> प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे गरजेचे
> मास्कचा वापर करणे बंधनकारक
> हँड सॅनिटायझरने वारंवार हात धुणे (४० ते ६० सेकंदांसाठी) आवश्यक.
> शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे आवश्यक.
> लक्षणे आढळल्यास त्वरीत हेल्पलाइनशी संपर्क साधणे गरजेचे.
> थुंकण्यास मनाई. थुंकताना आढळल्यास दंड आकारला जाईल.

क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार

सर्व धार्मिक स्थळांनी काय काळजी घ्यावी?

> प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक
> लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीलाच मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जावा.
> मास्क घातलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जावा.
> कोविड-१९ ची माहिती देणारे पोस्टर्स लावणे बंधनकारक
> एका वेळी किती जणांना प्रवेश द्यावा हे मंदिर किंवा धार्मिक स्थळाच्या आकारमानावर ठरवण्यात यावे.
> पादत्राणे, बूट आपल्या गाडीमध्येच ठेवावेत. किवा त्याच व्यक्तीने वेगळी व्यवस्था करावी.
> गर्दीचे नियोजन करावे, तसेच पार्किगची योग्य व्यवस्था आणि नियोजन करावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
> मंदिरे किंवा धार्मिक स्थळाबाहेर असलेली दुकाने, स्टॉल्सवर करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळावेत.
> रांगेत उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी योग्य नियोजन करून योग्य मार्किंग करावे
> लोकांच्या प्रवेशासाठी आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी
> रांगेत ६ फुटांचे अंतर पाळावे
> मंदिर किंवा धार्मिक स्थळाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय साबणाने स्वच्छ धूणे आवश्यक
> सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. एअर कंडिशन, आणि व्हेंटिलेशनबाबत सीबीडब्ल्यूडीचे पालन करणे आवश्यक आहे.
> पुतळे, मूर्त्या, पवित्र पुस्तकांना स्पर्श करण्यावर बंदी
> एकत्र जमण्यास प्रतिबंध
> लोकांनी नमस्कार करताना एकमेकांना स्पर्श करू नये.
> प्रार्थनेसाठी बसण्यासाठी सार्वजनिक चटईचा वापर टाळावा. प्रत्येकाने आपली स्वतंत्र चटई आणावी.
> प्रसाद, पवित्र पाणी अशा गोष्टींना मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये परवानगी नसेल.
> मंदिर/ धार्मिक स्थळांच्या आवारात सॅनिटायझेशनची, हात-पाय स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात यावी
> मंदिर/ धार्मिक स्थळांची वारंवार स्वच्छता करणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमधील फरशी, जमीन वारंवार स्वच्छ करणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये आलेल्या व्यक्तीने काढून टाकलेल्या मास्क, ग्लोव्हजी योग्य ती विल्हेवाट लावणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमधील कर्मचाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक. त्यांनी आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक.
> संख्या, जागा आणि अंतर प्रोटोकॉल प्रत्येक उपासनास्थळाद्वारे पालन केले जाईल, त्यावर पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवले जाईल.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ३,२८६ नवे रुग्ण वाढले; तर, मुंबई-ठाण्यात ‘ही’ स्थिती!

मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये करोना संशयित आढळल्यास काय काळजी घ्यावी?

> अशी व्यक्ती आढळल्यास तिचे इतरांपासून एका वेगळया खोलीत विलगीकरण करण्यात यावे.
> त्या व्यक्तीला मास्क घालण्यास द्यावा, तिची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी.
> जवळच्या क्लिनिकला किंवा रुग्णालयाला कळवावे, तसेच जिल्हा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
> सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तेथील जोखमीचे मूल्यमापन करण्यात यावे आणि आवश्यकता असेल तर त्यावर कार्यवाही करावी.
> व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास मंदिर/ धार्मिक स्थळाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

क्लिक करा आणि वाचा- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत: निवडणूक आयोग

Source link

Coronanew guidelinesnew SOPreligious placesधार्मिक स्थळे सुरू होणारनवी नियमावलीमंदिरे खुली होणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment