Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
SOP for religious places: मंदिरे, धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार; पाहा, संपूर्ण नवी नियमावली!
हायलाइट्स:
- ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा.
- धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक- मुख्यमंत्री
- राज्य सरकारकडून मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठी नवी नियमावली जाहीर.
अशी आहे नवी नियमावली
> प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे गरजेचे
> मास्कचा वापर करणे बंधनकारक
> हँड सॅनिटायझरने वारंवार हात धुणे (४० ते ६० सेकंदांसाठी) आवश्यक.
> शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे आवश्यक.
> लक्षणे आढळल्यास त्वरीत हेल्पलाइनशी संपर्क साधणे गरजेचे.
> थुंकण्यास मनाई. थुंकताना आढळल्यास दंड आकारला जाईल.
क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार
सर्व धार्मिक स्थळांनी काय काळजी घ्यावी?
> प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक
> लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीलाच मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जावा.
> मास्क घातलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जावा.
> कोविड-१९ ची माहिती देणारे पोस्टर्स लावणे बंधनकारक
> एका वेळी किती जणांना प्रवेश द्यावा हे मंदिर किंवा धार्मिक स्थळाच्या आकारमानावर ठरवण्यात यावे.
> पादत्राणे, बूट आपल्या गाडीमध्येच ठेवावेत. किवा त्याच व्यक्तीने वेगळी व्यवस्था करावी.
> गर्दीचे नियोजन करावे, तसेच पार्किगची योग्य व्यवस्था आणि नियोजन करावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
> मंदिरे किंवा धार्मिक स्थळाबाहेर असलेली दुकाने, स्टॉल्सवर करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळावेत.
> रांगेत उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी योग्य नियोजन करून योग्य मार्किंग करावे
> लोकांच्या प्रवेशासाठी आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी
> रांगेत ६ फुटांचे अंतर पाळावे
> मंदिर किंवा धार्मिक स्थळाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय साबणाने स्वच्छ धूणे आवश्यक
> सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. एअर कंडिशन, आणि व्हेंटिलेशनबाबत सीबीडब्ल्यूडीचे पालन करणे आवश्यक आहे.
> पुतळे, मूर्त्या, पवित्र पुस्तकांना स्पर्श करण्यावर बंदी
> एकत्र जमण्यास प्रतिबंध
> लोकांनी नमस्कार करताना एकमेकांना स्पर्श करू नये.
> प्रार्थनेसाठी बसण्यासाठी सार्वजनिक चटईचा वापर टाळावा. प्रत्येकाने आपली स्वतंत्र चटई आणावी.
> प्रसाद, पवित्र पाणी अशा गोष्टींना मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये परवानगी नसेल.
> मंदिर/ धार्मिक स्थळांच्या आवारात सॅनिटायझेशनची, हात-पाय स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात यावी
> मंदिर/ धार्मिक स्थळांची वारंवार स्वच्छता करणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमधील फरशी, जमीन वारंवार स्वच्छ करणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये आलेल्या व्यक्तीने काढून टाकलेल्या मास्क, ग्लोव्हजी योग्य ती विल्हेवाट लावणे बंधनकारक.
> मंदिर/ धार्मिक स्थळांमधील कर्मचाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक. त्यांनी आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक.
> संख्या, जागा आणि अंतर प्रोटोकॉल प्रत्येक उपासनास्थळाद्वारे पालन केले जाईल, त्यावर पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवले जाईल.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ३,२८६ नवे रुग्ण वाढले; तर, मुंबई-ठाण्यात ‘ही’ स्थिती!
मंदिर/ धार्मिक स्थळांमध्ये करोना संशयित आढळल्यास काय काळजी घ्यावी?
> अशी व्यक्ती आढळल्यास तिचे इतरांपासून एका वेगळया खोलीत विलगीकरण करण्यात यावे.
> त्या व्यक्तीला मास्क घालण्यास द्यावा, तिची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी.
> जवळच्या क्लिनिकला किंवा रुग्णालयाला कळवावे, तसेच जिल्हा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
> सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तेथील जोखमीचे मूल्यमापन करण्यात यावे आणि आवश्यकता असेल तर त्यावर कार्यवाही करावी.
> व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास मंदिर/ धार्मिक स्थळाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
क्लिक करा आणि वाचा- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत: निवडणूक आयोग