जिथं हा ज्वालामुखी सापडला तिथं एस्क्रिअस मॉन्स, पावोनिस मॉन्स आणि अर्शिया मॉन्स हे आणखी तीन ज्वालामुखी देखील आहेत. हे रंजक आहे की ते अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मंगळाच्या आग्नेय भागात हे ज्वालामुखी आहेत. ज्याच्या खाली हिमनदीतला बर्फ असण्याची शक्यता आहे.
ज्वालामुखी शोधण्यास लागला बराच वेळ
मंगळ हा आकाराने व क्षेत्राने खूप मोठा ग्रह आहे. तेथे उतरणारी मिशन्स एका विशिष्ट क्षेत्रात उतरत असतात. अंतराळात ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक आकाशयाने फिरतात. १९७१ पासून मंगळावर असलेला हा ज्वालामुखी बघण्यात आला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हा ज्वालामुखी असल्याची खात्री झाली आहे.
जेव्हा शास्त्रज्ञांनी या क्षेत्राचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना कळले की तो ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या आजूबाजूला ५ हजार चौरस किलोमीटर परिसरात छोट्या मोठ्या आकाराचे अनेक ज्वालामुखी असल्याचेही तपासात समोर आले आहे. जगातील सर्व अवकाश संस्था मंगळावर आपली मोहीम पाठवत आहेत. या शर्यतीत इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सही सामील आहे. ती जगातील सर्वात वजनदार रॉकेट स्टारशिपची चाचणी घेत आहे. ते रॉकेट यशस्वी झाल्यास भविष्यात अंतराळवीरांना मंगळावर नेणे सोपे होईल.