ई-वाहनांची मागणी वाढतेय, चालू वर्षात जगभरात १.७० कोटी वाहने विकली जातील असा अंदाज

वृत्तसंस्था, चेन्नई : विजेवर चालणाऱ्या वाहनांची (ई-वाहने) विक्री जगभरात हळूहळू गती घेऊ लागल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी, २०२३मध्ये जगभरात दर आठवड्याला सुमारे २.५ लाख ई-वाहने विकली गेली होती. ही गती कायम राखण्यास ई-वाहन उद्योगाला यश येत असून चालू (२०२४) वर्षात जगभरात सुमारे १.७० कोटी ई-वाहने विकली जातील, असा विश्वास इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए) या संस्थेने व्यक्त केला आहे.

आयईएने यासंदर्भात एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, चालू वर्षात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाच कारमध्ये एक ई-कार असेल. ही माहिती दि ग्लोबल ईव्ही आऊटलुक २०२४ या अहवालात ईआयएने प्रसिद्ध केली आहे.

जगभरात सन २०२३मध्ये १.४० कोटी ई-वाहने विकली गेली होती. या गेल्या वर्षात विकल्या गेलेल्या एकूण वाहनांच्या १८ टक्के विक्री ई-वाहनांची झाली होती. २०२२मध्ये १.०५ कोटी ई-वाहनांची विक्री झाली. २०२३मधील विक्री ही २०२२च्या तुलनेत ३५ लाखांनी अधिक होती. याचा अर्थ ही विक्री वार्षिक आधारावर ३५ टक्के अधिक झाली. ई-वाहनांचा स्वीकार अधिकाधिक ग्राहक करू लागले आहेत याचेच हे द्योतक मानले जात आहे.

गेल्यावर्षीच्या ई-वाहनांच्या विक्रीचे प्रमाण पाहता, प्रत्येक आठवड्यात सुमारे २.५ लाख ई-वाहनांपेक्षा अधिक वाहने विकली गेली असे म्हणण्यास वाव आहे. मागील दशकभरात जितकी ई-वाहने विकली गेली त्यापेक्षा ही विक्री अधिक दिसून आली आहे. २०२३मध्ये विकल्या गेलेल्या ई-कारपैकी सुमारे ५० टक्के वाहनांची निर्मिती चीनने केली होती. तरीही ई-वाहनांच्या जगभरातील विक्रीत चीनचा वाटा केवळ १० टक्केच राहिल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्यावर्षी जगातील एकूण ई-वाहनविक्रीपैकी चीन, युरोप व अमेरिका या प्रदेशांत ६५ टक्के विक्री झाली आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये मात्र अजून ई-वाहनांना अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. व्हिएतनाममध्ये जगभरात विकल्या गेलेल्या ई-वाहनांपैकी १५ टक्के कारची विक्री झाली, तर थायलंडमध्ये १० टक्के ई-कार विकल्या गेल्या.

उदयोन्मुख अर्थव्यवस्था व ई-वाहने
– या अर्थव्यवस्थांमध्ये ई-वाहनांचे प्रमाण कमी
– ई-वाहनखरेदीवर अनुदान व सवलती तसेच बॅटरीचे उत्पादन यांची महत्त्वाची भूमिका
– ई-कारविक्रीत भारताचा वाटा २ टक्के
– उत्पादनसंलग्न सवलत योजनेमुळे (पीएलआय) भारतात ई-वाहनांच्या उत्पादनाला गती
– ब्राझील (३ टक्के वाटा), मलेशिया (२ टक्के वाटा) व थायलंड येथे मुख्यतः चिनी ई-वाहनांची विक्री
– मेक्सिकोमध्ये ई-वाहनांना प्रतिसाद वाढताना दिसत आहे
अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसरा, २०२२मध्ये ६६ हजार लोक बनले अमेरिकन, पहिला नंबर कोणाचा?
जगभरातील ई-वाहनांची विक्री
वर्ष ई-वाहने
२०२४ १.७० कोटी
२०२३ १.४० कोटी
२०२२ १.०५ कोटी
(*अंदाज)

२०२३मधील प्रदेशनिहाय विक्री
प्रदेश प्रमाण (टक्के)
चीन ६०
युरोप २५
अमेरिका १०

Source link

chennaiE-vehicles saleElectrical vehiclesIEAInternational Energy Agency
Comments (0)
Add Comment