Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आयईएने यासंदर्भात एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, चालू वर्षात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाच कारमध्ये एक ई-कार असेल. ही माहिती दि ग्लोबल ईव्ही आऊटलुक २०२४ या अहवालात ईआयएने प्रसिद्ध केली आहे.
जगभरात सन २०२३मध्ये १.४० कोटी ई-वाहने विकली गेली होती. या गेल्या वर्षात विकल्या गेलेल्या एकूण वाहनांच्या १८ टक्के विक्री ई-वाहनांची झाली होती. २०२२मध्ये १.०५ कोटी ई-वाहनांची विक्री झाली. २०२३मधील विक्री ही २०२२च्या तुलनेत ३५ लाखांनी अधिक होती. याचा अर्थ ही विक्री वार्षिक आधारावर ३५ टक्के अधिक झाली. ई-वाहनांचा स्वीकार अधिकाधिक ग्राहक करू लागले आहेत याचेच हे द्योतक मानले जात आहे.
गेल्यावर्षीच्या ई-वाहनांच्या विक्रीचे प्रमाण पाहता, प्रत्येक आठवड्यात सुमारे २.५ लाख ई-वाहनांपेक्षा अधिक वाहने विकली गेली असे म्हणण्यास वाव आहे. मागील दशकभरात जितकी ई-वाहने विकली गेली त्यापेक्षा ही विक्री अधिक दिसून आली आहे. २०२३मध्ये विकल्या गेलेल्या ई-कारपैकी सुमारे ५० टक्के वाहनांची निर्मिती चीनने केली होती. तरीही ई-वाहनांच्या जगभरातील विक्रीत चीनचा वाटा केवळ १० टक्केच राहिल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्यावर्षी जगातील एकूण ई-वाहनविक्रीपैकी चीन, युरोप व अमेरिका या प्रदेशांत ६५ टक्के विक्री झाली आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये मात्र अजून ई-वाहनांना अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. व्हिएतनाममध्ये जगभरात विकल्या गेलेल्या ई-वाहनांपैकी १५ टक्के कारची विक्री झाली, तर थायलंडमध्ये १० टक्के ई-कार विकल्या गेल्या.
उदयोन्मुख अर्थव्यवस्था व ई-वाहने
– या अर्थव्यवस्थांमध्ये ई-वाहनांचे प्रमाण कमी
– ई-वाहनखरेदीवर अनुदान व सवलती तसेच बॅटरीचे उत्पादन यांची महत्त्वाची भूमिका
– ई-कारविक्रीत भारताचा वाटा २ टक्के
– उत्पादनसंलग्न सवलत योजनेमुळे (पीएलआय) भारतात ई-वाहनांच्या उत्पादनाला गती
– ब्राझील (३ टक्के वाटा), मलेशिया (२ टक्के वाटा) व थायलंड येथे मुख्यतः चिनी ई-वाहनांची विक्री
– मेक्सिकोमध्ये ई-वाहनांना प्रतिसाद वाढताना दिसत आहे
जगभरातील ई-वाहनांची विक्री
वर्ष ई-वाहने
२०२४ १.७० कोटी
२०२३ १.४० कोटी
२०२२ १.०५ कोटी
(*अंदाज)
२०२३मधील प्रदेशनिहाय विक्री
प्रदेश प्रमाण (टक्के)
चीन ६०
युरोप २५
अमेरिका १०