तमिळनाडूत पाण्याचे दुर्भीक्ष्य; २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती, दीडशे कोटींचा निधी उपलब्ध

वृत्तसंस्था, चेन्नई : वाढत्या उन्हाळ्यात तमिळनाडूला पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. राज्यात उपलब्ध पेयजल किती आहे, याचा आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी प्रशासनाला दिला आहेत. शेजारील कर्नाटकमध्ये गंभीर पाणीटंचाई जाणवत असताना तमिळनाडूने या प्रश्नी पूर्वतयारी सुरू केली आहे.तमिळनाडूतील विविध भागांत दुष्काळ जाणवत असून, उपलब्ध पिण्याच्या पाण्याची स्थिती याविषयी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यावर पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू शकते. राज्याच्या ईशान्य आणि सागर किनाऱ्यावरील भागात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, अन्य भागांत विशेषत: पश्चिम भागात तुलनेने कमी पाऊस झाला. त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल, त्या दृष्टीने नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिले. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे.

‘डेक्कन क्वीन’मध्ये जागेवरून गुंडगिरी; नागरिकांचा दहशतीखाली प्रवास, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

उष्माघाताचा इशारा

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान अंदाज विभागाने दिला आहे. राज्यातील कोल्लम, पलक्कड आणि थ्रिसूर या जिल्ह्यांमध्ये काळजी घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पलक्कडमध्ये ४१; तर कोल्लम आणि थ्रिसूर येथे ४० अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

केंद्राकडून दुष्काळनिधी

कलबुर्गी : केंद्र सरकारकडून तीन हजार ४९९ कोटींचा दुष्काळ निधी कर्नाटकसाठी मंजूर झाला आहे. यातील तीन हजार ४५४ कोटी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांनी दिली. उर्वरित रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे आभार मानले.

Source link

Chief Minister M.K. StalinKarnataka Water IssueNarendra Modi TOPICrainfall forecastTamil Nadu Water Crisisकर्नाटक पाणी समस्याचेन्नई न्यूजतमिळनाडू दुष्काळतमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनदुष्काळी जिल्हे
Comments (0)
Add Comment