सामना कव्हर करण्यासाठी किती कॅमेरे वापरले जातात?
- ऑउटसाइड ब्रॉडकास्टिंग स्टूडिओसाठी १
- फिल्ड प्ले कवर करण्यासाठी १२ कॅमेरे
- हॉक आय कॅमेरे ६
- रन आऊट व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी ४ कॅमेरे
- स्ट्राईक झोन कॅप्चर करण्यासाठी कॅमेरे २
- स्टंप कॅमेरे ४
- प्रोजेक्शन कॅमेरा १
कुठल्याही सामन्याचे थेट प्रेक्षेपण करण्यासाठी अनेक प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. यूजरला एक उत्तम एक्सपीरियंस प्रोवाइड करण्यासाठी हे कॅमेरे वापरले जातात.
मेन कॅमेरा- हा प्रायमरी कॅमेरा असतो, स्टेडियममध्ये काही विशेष ठिकाणी सेट करण्यात येतात. या कॅमेऱ्यातून सामन्याचे नीट चित्रीकरण करण्यात येते
बाउंड्री कॅमेरा- तुम्ही हे कॅमेरे बाउंड्रीरेषेजवळ अनेकदा पाहिले असतील. हे कॅमेरे फिल्डर्सच्या क्लोज-अप शॉट्ससाठी वापरले जातात. त्यांच्या मदतीने, खेळाडूंच्या हालचालींच्या डिटेल्स बघायला मिळतात.
स्टंप कॅमेरा- हे स्टंपच्या मध्यभागी स्थापित केले जातात. हे गोलंदाज, फलंदाज आणि किपर संबंधित विशेष रेकॉर्डिंग करतात. त्यांच्या मदतीनेच आपण स्टंपजवळ स्लो मोशन रिप्ले पाहू शकतो.
स्पायडर कॅमेरा- हा कॅमेरा नावाप्रमाणेच काम करतो. हा कॅमेरा आकाशात उभ्या आणि आडव्या दोन्ही दिशेने वायर्सच्या साहाय्याने फिरू शकतो. या कॅमेऱ्यांमधून डायनॅमिक एरियल शॉट्स घेता येतात.
अल्ट्रा स्लो-मोशन कॅमेरा- हाय स्पीड कॅमेरे उच्च फ्रेम दराने कोणतीही हालचाल कॅप्चर करतात. त्यांच्या मदतीने, स्लो मोशन रिप्ले तपशील उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने दर्शकांना हळुवारपणे खेळातील दृश्य बघायला मिळतात.
हेल्मेट कॅमेरा- सामन्यात खेळाडू जे हेल्मेट कॅमेरे घालतात, त्यावर देखील कॅमेरा बसवण्यात येतो. यामुळे खेळाडूच्या दृष्टिकोनातून दृश्य दिसते.
रोबोटिक कॅमेरा- रिमोट कंट्रोल कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवले जातात.
यासोबतच सामन्यात एकावेळी अनेक कॅमेरे वापरण्यात येतात. सामना सुरु असतांना प्रेक्षकांना टिपण्यासाठी देखील काही खास कॅमेरे असतात. दरवर्षी या कॅमेरा सिस्टिम व संख्येमध्ये वाढ होत आहे.