Mail.ru म्हणजे काय?
mail.ru रशियन वेबमेल सर्व्हिस आहे, जी १९९८ मध्ये लाँच करण्यात आली होती. ही रशिया आणि युरोपातील सर्वात मोठी वेबमेल प्रोव्हायडर आहे. या सर्व्हिसवर १०० मिलियन पेक्षा जास्त अॅक्टिव्ह ई-मेल अकाऊंट्स आहेत. ही जगातील पाचवी सर्वात मोठी मेल प्रोव्हायडर आहे. याचा अर्थ असा नाही की इतर देशांतील लोक ही सर्व्हिस वापरू शकत नाहीत. जगभरात कोणीही कुठूनही ही सर्व्हिस वापरू शकतं, ज्याप्रकारे जीमेल, याहू मेल इत्यादी वापरता येतात.
रशियातून धमकीचे ई-मेल आले का?
वर सांगितल्याप्रमाणे असे धमकीचे ई-मेल पाठवण्यासाठी व्हीपीएन कनेक्शनचा वापर केला जातो. यामुळे ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा मूळ आयपी अॅड्रेस दिसत नाही. त्यामुळे हा ई-मेल रशियातून आला असेलच असं म्हणता येईल. भारतात किंवा इतर कोणत्याही देशातून हा ई-मेल पाठवला जाऊ शकतो, व्हीपीएनवर लोकेशन रशिया सेट केल्यास तिथून मेल आल्याचं दिसत असावं.
आयपी अॅड्रेसचा शोध सुरु
प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांची टीम त्याच आयपी अॅड्रेसचा शोध घेत आहे, ज्यावरून हा मेल पाठवण्यात आलंय. हा अॅड्रेस मिळताच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणं सोपं होईल. तसेच ही खरंच धमकी आहे की कोणी मस्करी केली आहे, याचा तपास देखील पोलीस करत आहेत. सध्या देशात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे या धमकीकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही.