एका अहवालानुसार, 6G प्रोटोटाइपची चाचणी 328 फूट परिसरात करण्यात आली. याचे परिणाम नक्कीच चांगले होते, परंतु 6G ला पूर्ण यात पूर्णपणे यश मिळवता आले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची चाचणी केवळ एका उपकरणात करण्यात आली. तज्ज्ञांना कमर्शल स्वरूपात अजून याचा प्रभाव बघता आला नाही
सध्या, 5G तंत्रज्ञान जगभरातील कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात प्रगत मानले जाते. या तंत्रज्ञानाचा कमाल स्पीड 10Gbps आहे. याशिवाय, विविध देशांमध्ये 5G नेटवर्कचा वेग देखील वेगवेगळा आहे. अमेरिका, चीन, जपान आणि भारत या देशांनीही 6G वर काम सुरू केले आहे. असे मानले जाते की 6G च्या आगमनाने, लोक रिअल-टाइम होलोग्राफिक संभाषण करू शकतील. व्हर्च्युअल आणि मिक्स रिअलीटीच्या जगात लोकांना नवीन अनुभव मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जगभरात सध्या 5G नेटवर्कसाठी अनेक सुविधा तयार केल्या जात आहेत. मात्र अनेक देशांत ते अद्याप सुरूही झालेले नाही. असे असतांना 6G साठी कंपन्या आणि सरकारला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, मोबाईल टॉवर्स पूर्णपणे बदलावे लागतील आणि 6G इनबिल्ट अँटेना असलेले नवीन स्मार्टफोन बाजारात आणावे लागतील.
5G मध्ये काय खास आहे?
5G युजर्सला 4G नेटवर्कपेक्षा 20 पट अधिक स्पीड मिळतो. या स्पीडचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की संपूर्ण एचडी मूव्ही केवळ 1 सेकंदात डाउनलोड होते. 3G आणि 4G नेटवर्कच्या तुलनेत 5G यूजरला कोणत्याही त्यांच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी कनेक्ट होण्यात कोणतीही अडचण येत नाही. डेटाच्या पॅकेटला एका पॉइंटपासून दुस-या पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला लेटन्सी म्हणतात. 5G च्या बाबतीत, लेटन्सी दर 1 मिलीसेकंद असेल तर 4G नेटवर्कमध्ये हा दर 10 मिलीसेकंद इतका आहे. 5Gच्या तुलनेने 6G अधिक फास्ट असेल.