या टप्प्यात एआयएमआयएमच्या तीनही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. भाजपचे ७० पैकी ४०, शिवसेनेचे तीनपैकी दोन, भारत राष्ट्र समितीचे १७ पैकी १०, काँग्रेसचे ६१ पैकी ३५, तेलुगू देसमचे १७ पैकी ९, शिवसेना (उबाठा), राजद व बिजू जनता दलाचे प्रत्येकी ४ पैकी २, वायएसआरएसपीच्या २५ पैकी १२, तृणमूल काँग्रेसच्या ९ पैकी ३ तर समाजवादी पक्षाच्या १९ पैकी ७ उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले. यातील ११ उमेदवारांवर खुनाचे तर ३० उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.५० जणांवर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. ५ उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
कोट्यधीश बहुसंख्य
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ४७६ उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपने ७० पैकी सर्वाधिक ६५ कोट्यधीश उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसचे ५६ जण कोट्यधीश आहेत. शिवसेना उबाठा पक्षासह संयुक्त जनता दल, राजद आणि तेलुगू देसमचे सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. तेलुगू देसमचे चंद्रशेखर पेमसानी, भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी व तेलगू देसमचेच प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.
२४ उमेदवारांकडे शून्य मालमत्ता
या टप्प्यातील २४ उमेदवारांनी शून्य मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. मावळमधील भीमसेनेचे उमेदवार संतोष उबाळे यांनी आपल्याकडे फक्त ८३ रुपयेच आहेत, असे जाहीर केले आहे तर शिरूरमधील अपक्ष विकास भोर यांनी आपल्याकडे फक्त ९० रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.