प्रामुख्याने आहारातील मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यासह प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि पिळदार शरीरासाठी घेतले जाणारे प्रोटिन सप्लिमेंट टाळण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे.
१७ मुद्द्यांचा समावेश
– ‘आयसीएमआर’च्या अखत्यारीत कार्यरत ‘राष्ट्रीय पोषण संस्था’ (एनआयएन) या हैदराबादस्थित संस्थेकडून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी
– ‘आयसीएमआर-एनआयएन’च्या संचालक डॉ. हेमलता आर. यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांकडून मसुदा
– अत्यावश्यक पोषक तत्त्वांच्या गरजा पूर्ण करण्यासह असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणे हा प्रमुख उद्देश
– निरोगी अन्न निवडण्यासाठी पाकिटांवरील माहिती वाचणे गरजेचे असल्याचा सल्ला
– मार्गदर्शक तत्त्वांमध्ये १७ मुद्द्यांचा समावेश
हे आहेत प्रमुख मुद्दे
– प्रोटिन पावडरचे दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने हाडे आणि मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका
– साखर एकूण ऊर्जेच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असावी
– संतुलित आहारात तृण व भरडधान्यांमधून ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या जाऊ नयेत
– कडधान्य, द्विदल धान्य आणि मांसामधून १५ टक्क्यांपर्यंत कॅलरी पुरशा
– उरलेल्या कॅलरी काजू, भाज्या, फळे आणि दूध यांमधून मिळायला हव्यात
– चरबीचे एकूण सेवन ३० टक्के ऊर्जेपेक्षा कमी किंवा तितकेच असावे
‘एनआयएन’चे निरीक्षण
– कडधान्ये आणि मांसाची मर्यादित उपलब्धता आणि जास्त किंमतीमुळे देशातील मोठी लोकसंख्या तृणधान्यांवर अवलंबून
– परिणामी आवश्यक मॅक्रोन्युट्रिएंट्स (आवश्यक अमिनो अॅसिड व फॅटी ॲसिड) आणि सूक्ष्म पोषक घटकांचे सेवन कमी
– अत्यावश्यक पोषक घटकांच्या कमी सेवनामुळे चयापचय क्रिया विस्कळीत होण्यासह लहान वयातच मधुमेहाशी संबंधित विकारांचा धोका
पोषक आहाराअभावी आरोग्याची हानी
– देशातील एकूण आजारांपैकी ५६.४ टक्के आजार पोषक आहाराच्या अभावामुळे
– पोषक आहार आणि व्यायामामुळे हृदयविकार व उच्च रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटवणे शक्य
– त्याचप्रमाणे ८० टक्क्यांपर्यंत टाइप-२ मधुमेह टाळणे शक्य
– निरोगी जीवनशैलीतून अकाली मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य
– साखर व चरबीचा भरणा असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे अतिसेवन, कमी शारीरिक हालचाल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांचा अभाव यांमुळे लठ्ठपणाचा धोका