Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Health Tips: आरोग्याची टाळा हानी; मीठ, साखरेचे सेवन करा कमी! भारतीयांसाठी ICMRची नवी मार्गदर्शन तत्त्वे

13

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आहाराचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने नेमके काय खावे, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरतो. बदललेल्या जीवनशैलीत आहारपद्धती व सवयीदेखील बदलल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारतीयांसाठी नवी आहार मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत.

प्रामुख्याने आहारातील मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यासह प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि पिळदार शरीरासाठी घेतले जाणारे प्रोटिन सप्लिमेंट टाळण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे.

१७ मुद्द्यांचा समावेश

– ‘आयसीएमआर’च्या अखत्यारीत कार्यरत ‘राष्ट्रीय पोषण संस्था’ (एनआयएन) या हैदराबादस्थित संस्थेकडून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी
– ‘आयसीएमआर-एनआयएन’च्या संचालक डॉ. हेमलता आर. यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांकडून मसुदा
– अत्यावश्यक पोषक तत्त्वांच्या गरजा पूर्ण करण्यासह असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणे हा प्रमुख उद्देश
– निरोगी अन्न निवडण्यासाठी पाकिटांवरील माहिती वाचणे गरजेचे असल्याचा सल्ला
– मार्गदर्शक तत्त्वांमध्ये १७ मुद्द्यांचा समावेश

हे आहेत प्रमुख मुद्दे

– प्रोटिन पावडरचे दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने हाडे आणि मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका
– साखर एकूण ऊर्जेच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असावी
– संतुलित आहारात तृण व भरडधान्यांमधून ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या जाऊ नयेत
– कडधान्य, द्विदल धान्य आणि मांसामधून १५ टक्क्यांपर्यंत कॅलरी पुरशा
– उरलेल्या कॅलरी काजू, भाज्या, फळे आणि दूध यांमधून मिळायला हव्यात
– चरबीचे एकूण सेवन ३० टक्के ऊर्जेपेक्षा कमी किंवा तितकेच असावे
रस्त्यावरील उघडे, शिळे खाद्यपदार्थ खाणे टाळा; अन्नविषबाधेच्या पार्श्वभूमीवर BMCचे आवाहन
‘एनआयएन’चे निरीक्षण

– कडधान्ये आणि मांसाची मर्यादित उपलब्धता आणि जास्त किंमतीमुळे देशातील मोठी लोकसंख्या तृणधान्यांवर अवलंबून
– परिणामी आवश्यक मॅक्रोन्युट्रिएंट्स (आवश्यक अमिनो अॅसिड व फॅटी ॲसिड) आणि सूक्ष्म पोषक घटकांचे सेवन कमी
– अत्यावश्यक पोषक घटकांच्या कमी सेवनामुळे चयापचय क्रिया विस्कळीत होण्यासह लहान वयातच मधुमेहाशी संबंधित विकारांचा धोका

पोषक आहाराअभावी आरोग्याची हानी

– देशातील एकूण आजारांपैकी ५६.४ टक्के आजार पोषक आहाराच्या अभावामुळे
– पोषक आहार आणि व्यायामामुळे हृदयविकार व उच्च रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटवणे शक्य
– त्याचप्रमाणे ८० टक्क्यांपर्यंत टाइप-२ मधुमेह टाळणे शक्य
– निरोगी जीवनशैलीतून अकाली मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य
– साखर व चरबीचा भरणा असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे अतिसेवन, कमी शारीरिक हालचाल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांचा अभाव यांमुळे लठ्ठपणाचा धोका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.