Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 21 to 27 October 2024 : कर्कसह २ राशीचे ब्रेकअप! नात्यात संयमाने घ्या, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

11

Saptahik Love Rashifal, 21 to 27 October 2024 : ऑक्टोबरच्या या आठवड्यात चंद्र-गुरूची युती होणार आहे. त्यामुळे गौरी योग तयार होईल. त्यामुळे कर्कसह काही राशीच्या नात्याला ब्रेक लागेल. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा, समस्या निर्माण होतील. नात्यात मोठे बदल करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा विचार करा. जाणून घेऊया मेष ते मीन पर्यंतच्या १२ राशींचे प्रेम राशीभविष्य सविस्तर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 21 to 27 October 2024 : कर्कसह २ राशीचे ब्रेकअप! नात्यात संयमाने घ्या, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

Saptahik Love Rashifal :
ऑक्टोबरच्या या आठवड्यात चंद्र-गुरू युती होणार आहे. त्यामुळे गौरी योग तयार होईल. त्यामुळे कर्कसह काही राशीच्या नात्याला ब्रेक लागेल. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा, समस्या निर्माण होतील. नात्यात मोठे बदल करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा विचार करा. प्रेम जीवनात हव ते मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. जोडीदारासोबत नवीन ठिकाणी जाण्याची योजना आखाल. तुमच्या नात्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. संयमाने निर्णय घेतल्यास त्यात ठाम राहा तरच जीवनात शांतता मिळेल. तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. नात्यात अडचणी येतील. जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यातील या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – वाद घालणे टाळा

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत थोडा कठीण असेल. काहीतरी नवीन करताना शंकेची पाल चुकचुकेल. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा, समस्या निर्माण होतील. नात्यात मोठे बदल करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा विचार करा. प्रेम जीवनात हव ते मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

वृषभ साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नाते घट्ट होईल

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी चांगला राहिल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जवळच्या व्यक्तीकडून आशीर्वाद मिळतील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मिथुन साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – जोडीदाराचे प्रेम मिळेल

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. नात्यासाठी ही वेळ अनुकूल राहिल. जोडीदारासोबत नवीन ठिकाणी जाण्याची योजना आखाल. तुमच्या नात्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल.

कर्क साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – समस्या येतील

हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या होतील. आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत काही मुद्द्दयावरुन वाद होतील. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

सिंह साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – संवाद साधा

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि रोमान्सने भरलेला असेल. जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील. नात्याबद्दल तुम्ही अधिक आशावादी असाल. तुमच्या नात्यात सकारात्मकता येईल. नात्यात अडचणी आल्यास संवाद साधा. प्रेम जीवन सामान्य असेल.

कन्‍या साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नाते बिघडेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत थोडा कठीण असेल. नातेसंबंधात काही समस्या येतील. संवादातून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात नवीन सुरुवात होईल.

तुळ साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नाते घट्ट होईल

तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. या आठवड्यात तुमचे नाते अधिक घट्ट होईल. नात्यात तुम्ही अधिक आनंदी असाल. कोणतीही नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणेल. जोडीदारासोबत पार्टीचा मूड असेल. बाहेर जाण्याचा प्लान कराल.

वृश्चिक साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नात्यात अडचणी येतील.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला राहिल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. संयम राखल्यास जीवनात शांतात नांदेल. संयमाने निर्णय घेतल्यास त्यात ठाम राहा तरच जीवनात शांतता मिळेल. तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. नात्यात अडचणी येतील.

धनु साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेमात दूरावा जाणवेल.

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत थोडा कठीण जाईल. प्रेमातून हवा असणारा आनंद मिळणार नाही. तुमच्या प्रेम जीवनाबद्द थोडेसे चिंतित आणि असमाधानी असाल.

मकर साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नाते मजबूत होईल

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहिल. तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. प्रेमामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. तरुण व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. धार्मिक व्यक्तीचे आशीर्वाद तुमचे नाते मजबूत करतील. जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होतील. प्रेम जीवनात शांतता नांदेल.

कुंभ साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – नाते घट्ट होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने अतिशय शुभ असेल. या आठवड्यात नात्यात प्रेम आणि रोमान्स राहिल. प्रेम जीवन रोमँटिक राहिल. जोडीदाराला चांगल्याप्रकारे समजून घ्याल. नाते अधिक घट्ट होईल. जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा वाढेल. प्रेम जीवनात शांतता राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मीन साप्‍ताहिक प्रेम राशीभविष्य – प्रेमात आनंद मिळेल.

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. या आठवड्यात नात्यात काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील. नवीन विचार प्रेम जीवनात काहीतरी नवीन करतील. जोडीदारासोबत पूर्वीपेक्षा चांगले राहाल. परिस्थिती अनुकूल राहिल. तुमचे मन प्रसन्न असेल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.