Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२४ : मेषसह २ राशींचा मानसिक ताण वाढेल! नुकसान होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

5

Rashi Bhavishya 19 october 2024 Today Horoscope in Marathi : आज १९ ऑक्टोबर शनिवार असून शश राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे मकर राशीसह ५ राशींवर शनिदेवाची कृपा राहिल. बोलण्यात गोडवा कायम ठेवा. आरोग्य अनुकूल राहिल. मानसिक ताण जाणवेल. प्रवासाला जात असाल तर काळजी घ्या. तुमचे मन अशांत राहिल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२४ : मेषसह २ राशींचा मानसिक ताण वाढेल! नुकसान होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 19 october 2024 :
आज १९ ऑक्टोबर शनिवार असून शश राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे मकर राशीसह ५ राशींवर शनिदेवाची कृपा राहिल. बोलण्यात गोडवा कायम ठेवा. आरोग्य अनुकूल राहिल. मानसिक ताण जाणवेल. प्रवासाला जात असाल तर काळजी घ्या. तुमचे मन अशांत राहिल. कौटुंबिक सदस्य काही आजाराने त्रस्त असतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते. बाहेरचे अन्न खाणे टाळा. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर ते आज संपतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – मानसिक ताण जाणवेल

आज तुमच्या रागीट स्वभावामुळे वाद वाढतील. कुटुंबातील वरिष्ठांकडून ऐकावे लागेल. कार्यालयात अधिकाऱ्यांशी मतभेद हानिकारक ठरतील. बोलण्यात गोडवा कायम ठेवा. आरोग्य अनुकूल राहिल. मानसिक ताण जाणवेल. प्रवासाला जात असाल तर काळजी घ्या.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा

वृषभ – आरोग्याची काळजी घ्या

आज सरकारी कामे पुढे ढकलावी लागतील. व्यवहारात तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. आज तुमच्या छोट्याशा चुकीमुळे घरात वाद होऊ शकतात. तुमचे मन अशांत राहिल. कौटुंबिक सदस्य काही आजाराने त्रस्त असतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते. बाहेरचे अन्न खाणे टाळा.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने राहिल. गाईला चपाती खाऊ घाला.

मिथुन – जोडीदाराचे सहकार्य मिळेल

आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळेल. कोणताही निर्णय नीट विचारपूर्वक घ्या. एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, विश्वासघात होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर ते आज संपतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासेल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा.

कर्क – मन अस्वस्थ राहिल

आज नोकरदार लोकांना काही गोष्टींवर समाधानी राहावे लागेल. तुमच्या पगारात वाढ होईल. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळेल. कोणतेही काम करणार असाल तर त्यात निराशा येईल. महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे कामात अडथळा येईल. व्यवसायात कोणताही करार न झाल्यामुळे मन अस्वस्थ राहिल. आर्थिक लाभ अपेक्षेप्रमाणे होईल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मी देवीला खीर अर्पण करा

सिंह – मतभेद होतील

आज तुम्ही कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर संयमाने घ्या. भविष्यात तुमच्यासमोर मोठ्या समस्या निर्माण होतील. आईसोबत मतभेद होऊ शकतात. तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण खराब होईल. व्यवसायात जोखीम घेऊ नका.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या

कन्या – खर्चावर नियंत्रण ठेवा

आज तुम्हाला सरकारी मदत मिळेल. सामाजिक संवाद वाढवल्याने लाभ होतील. तुमचे नवीन मित्र बनू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराच्या पाठिंब्याने फायदा होईल. मुलांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेण्यासाठी तुमच्या पालकांचा सल्ला घ्याल.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदन लावा.

तुळ – बुद्धीचा वापर करा

आज व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहिल. स्वभावात बदल होईल. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा वादात सापडाल. तुम्हाला बुद्धिचा वापर करावा लागेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. मालमत्ता खरेदी कराल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान शंकराला जल अर्पण करा

वृश्चिक – खर्च वाढेल

आज तुम्हाला कोणतेही काम करावे लागेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दिलेले वचन पूर्ण कराल. कुटुंबातील तरुण मुले आज तुमच्याकडे काही मागण्या करतील. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. चांगली बातमी मिळाल्याने उत्साही असाल. नोकरदार लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची उपासना करा.

धनु – वाहन खरेदी कराल

आजचा दिवस चांगले परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळावे लागतील, नुकसान होऊ शकते. व्यवसायात अडकलेला पैसा आज मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. नवीन वाहन घेण्यासाठी आजचा दिवस चांगला राहिल. परिश्रमानंतर यश मिळेल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा

मकर – नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमची सर्व कामे यशस्वीपणे पार पडतील. तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रेम जीवन जगणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहिल.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

कुंभ – वादापासून दूर राहा

आज तुम्हाला अनेक आजार त्रास देतील. तुमच्या काही समस्या वाढू शकतात. एखाद्याला पैसे अजिबात उधार देऊ नका. व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर नफा-तोटा जाणून घ्या. शेजारी काही वाद झाले असतील तर त्यापासून दूर राहा.

आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुच्या मंदिरात चण्याची डाळ, गुळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा

मीन – आर्थिक लाभ होतील

आज मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. लांबचा प्रवास कराल ज्यातून तुम्हाला फायदा होईल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होईल. काही आवडत्या वस्तू खरेदी कराल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न-वस्त्र दान करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.