Lok Sabha: कोणी ५७०५ कोटींचं मालक, तर कोणाची ४५६८ कोटींची संपत्ती; चौथ्या टप्प्यात ४७६ उमेदवार कोट्यधीश

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १७१० उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद केलं जाईल. यापैकी ४७६ उमेदवार म्हणजेच २८ टक्के कोट्यधीश आहेत. तर २४ उमेदवार असे आहेत, ज्यांची संमत्ती शून्य आहे. चौथ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची सरासरी संपत्ती ११.७२ कोटी रुपये आहे.आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून निवडणूक लढवणारे तेलुगू देशम पार्टीचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे ५७०५ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी आहेत, ज्यांची संपत्ती ४५६८ कोटी रुपये आहे. रेड्डी तेलंगानातील चेवेल्लातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, चौथ्या टप्प्यात भाजपच्या ७० उमेदवारांपैकी ६५ ते ९३ टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर काँग्रेसचे ५६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना (उबाठा), बीजेडी, आरजेडी, टीडीपी, भारत राष्ट्र समिती आणि शिवसेना यांनी जितके उमेदवार उभे केले आहेत, ते सर्व कोट्यधीश आहेत.
Nitesh Rane : साम-दाम-दंड-भेद वापरून, घासून नाहीतर ठासून उमेदवार जिंकून आणू; नितेश राणेंनी ठणकावून सांगितलं
पश्चिम बंगालमधील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे ७ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर समाजवादी पक्षाच्या १९ उमेदवारांपैकी ११ अर्थात ५८ टक्के उमेदवारांनी त्यांची संपत्ती एक कोटीहून अधिक असल्याचं जाहीर केलं आहे.

चौथ्या टप्प्यात भाजप उमेदवारांची सरासरी संपत्ती १०१.७७ कोटी रुपये आहे, तर काँग्रेस उमेदवारांची सरासरी संपत्ती २३.६६ कोटी आहे. निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक उमेदवार (९२) उमेदवार उतरवणाऱ्या बहुजन समाज पार्टीकडे सर्वात कमी जाहीर करण्यात आलेली संपत्ती १.९४ कोटी रुपये आहे.
Sharad Pawar : व्यक्तिगत सोडाच राजकीय दृष्टीनेही कधीच मोदींसोबत जाणार नाही, मोदींची ती ऑफर पवारांनी धुडकावली
Sharad Pawar : व्यक्तिगत सोडाच राजकीय दृष्टीनेही कधीच मोदींसोबत जाणार नाही, मोदींची ती ऑफर पवारांनी धुडकावली
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात भाजपने ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यापैकी १० उमेदवारांकडे ५० कोटींहून अधिकची संपत्ती आहेत. पक्षाच्या जवळपास ४४.३ टक्के उमेदवारांनी १ कोटी ते १० कोटींपर्यंतची संपत्ती जाहीर केली आहे. केवळ ५ उमेदवारांकडे ५ कोटीहून कमी संपत्ती आहे.

काँग्रेसच्या ६१ उमेदवारांपैकी ७ जणांची संपत्ती ५० कोटींहून अधिक आहे. केवळ ८ टक्के उमेदवारांकडे एक कोटीहून कमी संपत्ती आहे. दुसरीकडे सपाच्या १९ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांची संपत्ती एक कोटी ते १० कोटींच्या दरम्यान आहे.

सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ५ उमेदवार

डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी – आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा जागेसाठी असलेले टीडीपी उमेदवार पेम्मासानी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. ५७०५.५ कोटी संपत्तीचे ते मालक आहेत. तर त्यांच्यावर १०३८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. त्याच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे.

कोंडा विश्वेश्वर रेड्डी – तेलंगानातील चेवेल्लातील भाजप उमेदवार असलेले रेड्डी यांच्याकडे ४५६८ कोटी संपत्ती आहे. ते कोट्यधीश उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर १३ कोटींहून अधिकचं कर्ज आहे. त्यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहेत.

प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी – आंध्र प्रदेशातील नेल्लोरमधून उमेदवार असलेल्या टीडीपी उमेदवाराची संपत्ती ७१६ कोटी रुपये आहे. तर त्यांच्यावर दोन कोटींचं कर्ज आहे. त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत.

अमृता रॉय – पश्चिम बंगालच्या कृष्णानगरमधून भाजप उमेदवार अमृता यांची ५५४ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही.

सीएम रमेश – आंध्र प्रदेशातील अनाकापल्लेमधील भाजप उमेदवाराकडे ४९७ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. त्यांच्यावर १०१ कोटींचं कर्ज आहे. त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.

Source link

chandra sekhar pemmasanikonda vishweshwar reddyLok Sabha 2024lok sabha candidate net worthlok sabha rich candidateकोंडा विश्वेश्वर रेड्डीचंद्रशेखर पेम्मासानीलोकसभा उमेदवार संपत्तीलोकसभा उमेदवारांची कोट्यवधींची संपत्तीलोकसभा २०२४
Comments (0)
Add Comment