निधी अल्पसंख्याकांना दिला , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सोनिया गांधींवर आरोप

वृत्तसंस्था, रायबरेली/प्रतापगड :‘काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या खासदार निधीतील ७० टक्के वाटा अल्पसंख्याकांना दिला,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील सभेत केला. ‘राहुल गांधी पाकिस्तानकडील अणुबॉम्बला घाबरत असतील; पण भाजप अजिबात घाबरत नाही,’ अशी टीका प्रतापगडमधील सभेत त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अमित शहांच्या उत्तर प्रदेशात सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.‘तुम्ही गांधी कुटुंबाला अनेक वर्षे संधी दिलीत. मात्र इथला विकास झाला नाही. त्यांचा विकासावर विश्वास नाही. ते तुमच्या सुख किंवा दु:खातही तुमच्याकडे येणार नाहीत. परंतु आम्ही रायबरेलीला मोदींच्या विकासयात्रेशी नक्कीच जोडू,’ असे आश्वासन शहा यांनी रायबरेलीकरांना दिले. ‘शहजादा तुमच्याकडे मत मागायला आला आहे. तुम्ही अनेक वर्षे त्यांना मतदान करीत आहात; पण तुम्हाला खासदारनिधीमधून काही मिळाले आहे का? जर तुम्हाला काहीच मिळालेले नाही तर हा पैसा गेला कुठे? तर तो त्यांच्या ‘व्होट बँके’कडे गेला आहे. सोनिया गांधींनी आपला ७० टक्के निधी अल्पसंख्याकांसाठी खर्च केला,’ असा दावा त्यांनी केला. ‘खोटे बोलण्यात गांधी घराण्याचा हात कोणीच धरू शकत नाही’, अशी टीकाही या वेळी केली.
Nashik Lok Sabha : अजितदादांचा फोन आणि कोकाटे नरमले, गोडसेंबाबत कडवटपणा दूर, माणिकराव महायुतीच्या प्रचारात

प्रतापगड येथील सभेत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन शहा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘राहुलबाबा तुम्हाला पाकिस्तानकडील अणुबॉम्बला घाबरायचे असेल तर घाबरा, आम्ही मात्र अजिबात घाबरत नाहीत. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग असून, आम्ही तो परत मिळवू,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक विकासाची कामे केली आहेत. देश विकासाच्या वाटेवर चालला असून, तिसऱ्या ‘टर्म’मध्येही हाच मार्ग सुरू राहील, असेही ते म्हणाले. विरोधक मोदी सरकारवर निराधार आरोप करीत असून, येत्या निवडणुकीत मतदानातून विरोधकांना खरे उत्तर मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

‘देशाच्या पैशाचे पाच श्रीमंतांनाच वाटप’

काँग्रेसचे रायबरेलीतील उमेदवार आणि बंधू राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत प्रियांका गांधी-वद्रा यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. मोदींनी देशाचा सर्व पैसा केवळ चार ते पाच श्रीमंतांना वाटला, असा आरोप त्यांनी केला. ‘खाजगीकरण वाईट नाही; पण पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंतांना दिली तर ते अयोग्यच आहे. आज देशातील कोळसा, वीज, बंदरे, विमानतळ सर्व काही पंतप्रधानांच्या मित्रांकडे आहे,’ असे प्रियांका म्हणाल्या.

Source link

Amit Shah Allegations Sonia Gandhiamit shah newslok sabha election 2024Rai Bareli Amit Shah Speechअमित शहा आरोप सोनिया गांधीअमित शहा बातम्यारायबरेली अमित शहा भाषणलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment