Infinix GT 20 Pro ची किंमत
एक प्रेस रिलीज मध्ये कंपनीनं सांगितलं आहे की Infinix GT 20 Pro ची भारतात किंमत 25 हजार रुपयांच्या आत असेल. या प्राइस सेगमेंटमध्ये हा फोन OnePlus Nord CE 4, Realme Narzo 70 Pro 5G आणि Samsung Galaxy M55 5G सारख्या डिवाइसना टक्कर देईल. Infinix GT 20 Pro 21 मेला Infinix GT Book लॅपटॉपसह सादर केला जाईल. Flipkart वर याचं एक वेबपेज देखील बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये LED इंटरफेससह ‘सायबर मेचा’ डिजाइन देण्यात आली आहे.
साऊदी अरेबियात झाला होता लाँच
साऊदी अरेबियात लाँच करण्यात आलेल्या Infinix GT 20 Pro ची किंमत SAR 1,299 (जवळपास 28,800 रुपये) आहे. हा अँड्रॉइड 14 आधारित XOS 14 वर चालतो. फोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,436 पिक्सल्स) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz हर्ट्झ आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर देण्यात आला आहे आणि डेडिकेटेड X5 टर्बो गेमिंग चिप देखील आहे.
भारतात येत असलेल्या Infinix GT 20 Pro मध्ये 8 जीबी आणि 12 जीबी LPDDR5X रॅम दिली जाईल. तसेच हा फोन 256GB पर्यंत स्टोरेजसह सादर केला जाईल. GT 20 Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32 एमपीचा सेल्फी शुटर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी आहे, जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.