परराष्ट्र मंत्रालयाने आज ( १७ मे ) याबाबतची माहिती दिली असून पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना शांतता चर्चेसाठी इस्रायलला पाठवले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
अजित डोवाल कोण आहेत ?
अजित डोवाल हे पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. १९४५ मध्ये उत्तराखंड राज्यात त्यांचा जन्म झाला. १९६८ मध्ये अजित डोवाल यांनी आयपीएस अधिकारी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. दहशतवाद्यांकडून १९७१ ते १९९९ दरम्यान इंडियन एअरलाइन्सचे १५ वेळा विमाने हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस अजित डोवाल यांनी अत्यंत हुशारीने परिस्थिती हाताळली होती. तसेच सप्टेंबर २०१६ चे सर्जिकल स्ट्राइक आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइक हे अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली पार पडले. अजित डोवाल यांना विविध नामांकित पुरस्कारांसह भारतीय लष्कराच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘किर्ती चक्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रसरकारकडून डोवाल यांना कॅबिनेट दर्जा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रसरकारने अजित डोवाल यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा कार्यकाळ वाढवून त्यांना कॅबिनेट दर्जा दिला आहे.