Vivo Pad 3 मध्ये काय खास असेल यावर एक नजर टाकूया:
मोठा डिस्प्ले आणि हाय रिफ्रेश रेट
असे म्हटले जात आहे की Vivo Pad 3 मध्ये मोठा 12.1 इंच LCD डिस्प्ले असेल, जो 2800×1968 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. विशेष गोष्ट अशी आहे की डिस्प्लेमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट देण्यात येईल, गेम खेळताना किंवा कोणतेही कंटेंट पाहताना यूजर्सना उत्तम अनुभव देईल
प्रोसेसर आणि बॅटरी देखील दमदार
या टॅबमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे. ही Qualcommची नवीन सब-फ्लॅगशिप चिप आहे, त्यामुळे तुमची रोजची कामे तसेच गेमिंसाठी हा डिवाइस बेस्ट चॉइस ठरेल. टॅब 10000mAh ची मोठी बॅटरी पॅक देण्यात येईल, याचा अर्थ वारंवार चार्जिंग करण्याचा त्रास यूजर्सना होणार नाही.
फोटोग्राफीसाठी बेसीक कॅमेरा
आता हा परवडणारा टॅब्लेट असल्याने फोटो आणि व्हिडीओसाठी यात बेसिक कॅमेरा सेटअप असेल. असे बोलले जात आहे की सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा असेल, तर मागील बाजूस 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येईल.
हेवी रॅम आणि अधिक स्टोरेज
सिक्युरिटी म्हणून, यात 2D फेशियल रेकग्निशन सपोर्ट असेल. टिपस्टरने असेही म्हटले आहे की हा टॅब्लेट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येईल. शिवाय, ते इतर कॉन्फिगरेशनमध्ये देखील लॉन्च केले जाईल.