Poco India नं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर Poco F6 सीरीज डेडिकेटेड मायक्रोसाइट लाइव्ह केली आहे. या साइटच्या माध्यमातून स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. हे फोन भारतात 23 मेला लाँच होतील. हे फोन 23 मे संध्याकाळी 4.30 वाजता भारतात लाँच होतील. परंतु ग्लोबल साइटवर या फोनसह Poco Pad देखील टीज करण्यात आला आहे.
सध्या कंपनीनं Poco Pad ची लाँच डेट कंफर्म केली नाही. परंतु हा Poco F6 सीरीज मायक्रोसाइटवर टीज करण्यात आला आहे, त्यामुळे अंदाज लावला जात आहे की हा टॅब देखील 23 मेला येऊ शकतो. या टॅब बद्दल कंपनीनं माहिती दिली आहे की हा टॅब मोठ्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच, या टॅब संबंधित इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.
Poco Pad leak Specs
वर सांगितल्याप्रमाणे Poco Pad ची माहिती लीक्स मधून समोर येत आहे. त्यामुळे लीकच्या माध्यमातून याचे अनेक फीचर्स ऑनलाइन समोर आले आहेत. लीकनुसार, हा टॅब 12.1 इंचाच्या मोठ्या IPS डिस्प्लेसह बाजारात येईल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच या टॅब मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी यात 8MP चा रियर कॅमेरा दिला जाईल. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी पण 8MP चा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. टॅबची बॅटरी 10,000mAh ची असेल, त्याचबरोबर 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.