तनिष्काला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र या विषयांमध्ये शंभर पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात ९५, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात शंभर पैकी १०० गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ८९ गुण, सेक्रेटरी प्रॉपर्टीज ९८ असे एकूण 582 गुण मिळाले. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये तिला १८ गुण होते यामुळे तिथे एकूण गुण ६०० झाले .
तनिष्का लहानपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी होत होती. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भाग घेतला आहे. बारावीमध्ये असताना दडपण होते, तिला सुरुवातीला फारसा वेळ दिला नाही. मात्र शेवटचा दीड महिना राहिला असताना तिने अभ्यासाकडे लक्ष दिले आणि काळजीपूर्वक अभ्यास केला. एक वेळा अभ्यास करायला बसले की पूर्ण अभ्यास होईपर्यंत ती उठत नसे. सातत्य ठेवून अभ्यास केल्यामुळे हे यश मिळाल्या तनिष्काने सांगितले. शंभर पैकी शंभर गुण मिळाल्यामुळे खूप आनंद होतो आणि याचा श्रेय आई रेणुका व वडील सागर यांचा असल्याचे तिने सांगितले.
तनिष्का लहानपणापासूनच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी होते. तसेच अभ्यासामध्ये देखील लक्ष देते. बारावीमध्ये चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र शंभर पैकी शंभर टक्के मिळतील अशी अपेक्षा नव्हती. मुलीला शंभर पैकी शंभर गुण मिळाल्याचा अभिमान वाटतो, असे आई रेणुका बोरामणीकर या म्हणाल्या.
आमची तनिष्का लहानपणापासूनच अभ्यासामध्ये व खेळामध्ये हुशार आहे. तनिष्काला अभ्यास व तिच्या बुद्धिबळ स्पर्धेबाबत कुठलीच आठवण करून द्यावी लागत नाही. तिचे काम जबाबदारीने पार पडते. आज तनिष्काला बारावीमध्ये शंभर पैकी शंभर टक्के मिळाल्याचा आनंद आहे असे तिचे वडील सागर बोरामणीकर म्हणाले.