फक्त 13 हजारांमध्ये नवाकोरा Smart TV, सोबत 170 चॅनेल्स मोफत

Xiaomi Smart TV A Series 2024 एडिशन लाइनअप 32 इंच, 40 इंच आणि 43 इंच स्क्रीन साइज मॉडेल्ससह भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये Xiaomi TV+ चा सपोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे युजर्स टीव्हीमध्ये 150 पेक्षा जास्त चॅनेल पाहू शकतात. तसेच नवीन सीरीजच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 1.5 जीबी पर्यंत रॅम आणि 8 जीबी स्टोरेज मिळते. इतकेच नव्हे तर मनोरंजनसाठी टीव्हीज मध्ये इन-बिल्ट क्रोमकास्ट देखील मिळतो. याच्या माध्यमातून युजर्स OTT अ‍ॅप्सवर लेटेस्ट वेब सीरीज आणि फिल्म्स पाहू शकतात.

Xiaomi Smart TV A Series 2024 Edition

शाओमीची नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज 30 इंच, 40 इंच आणि 43 इंचाच्या स्क्रीन साइज मध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1,920 x 1,080 पिक्सल, कलर डेप्थ 16.7 मिलियन आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी Vivid Picture इंजिन देण्यात आलं आहे. याच्या 40 आणि 43 इंचाचा टीव्हीमध्ये Quad-core Cortex A55 प्रोसेसर मिळतो, तर 32 इंचाच्या टीव्हीमध्ये Quad-core Cortex A35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Acer ने डॉल्बी ॲटमॉस 3D साउंड सिस्टीमसह आणले 65 इंचापर्यंतचे चार स्मार्ट टीव्ही
कंपनीनं नवीन सीरीजच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 1.5GB पर्यंत रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात Google TV सह Xiaomi TV+ आणि Patchwall+ चा सपोर्ट मिळतो. तसेच, टीव्हीमध्ये 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत, जे Dolby Audio, DTS:X आणि DTS Virtual: Xसह येतात.

शाओमीच्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये OTT अ‍ॅप्स वापर करण्यासाठी इन-बिल्ट क्रोमकास्ट देण्यात आला आहे. यात Universal Search, Kids Mode आणि Parental लॉक सारखे फीचर्स देखील मिळतात. इतकेच नव्हे तर टीव्हीज मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, 2 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत.

Xiaomi Smart TV ची किंमत

Xiaomi Smart TV A Series 2024 मध्ये येणाऱ्या 32 इंचाच्या टीव्हीची किंमत 12,999 रुपये आहे. तर, या सीरीजचा 40 इंच आणि 43 इंचाचा टीव्ही अनुक्रमे 22,999 रुपये आणि 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या लाइनअपचे टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून विकत घेता येतील.

Source link

smart tv a series 2024 editionxiaomi smart tvxiaomi smart tv a 32xiaomi smart tv a seriesxiaomi tv specificationsशाओमीशाओमी स्मार्ट टीव्हीस्मार्ट टीव्हीस्वस्त स्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment