पूर्वमोसमी हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे. ते १०२ किलोमीटर प्रती तास या वेगाने धडकेल, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी म्हटले आहे.
समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्यावर परतावे, असा सल्ला देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सागरीपृष्ठाचे तापमान वाढत आहे. गेल्या ३० वर्षांचा आढावा घेतल्यास अशा परिस्थितीत चक्रीवादळ येणे साहजिक असल्याचे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी म्हटले आहे.
केरळला पावसाचा तडाखा (फोटो आहे)
कोची : केरळमध्ये गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्यांत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान १९ मे पासूनच्या चार दिवसांत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी तिरुवनंतपूरम, कोची आणि त्रिसूरसह अन्य महत्त्वाच्या शहरांना पावसाने तडाखा दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. कोचीमधील बस स्टँडमध्ये पाणी भरले. एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्यांचा आधीचा ‘ऑरेंज अलर्ट’ वाढवून आता ‘रेड अॅलर्ट’ करण्यात आला आहे. तर अलापुझा, कोट्टायम, इदुक्की, पलक्कड, वायनाड आदी जिल्ह्यांना ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे.