Papua New Guinea landslide: पापुआमध्ये भूस्खलन; २००० लोक गाडले गेले, ढिगाऱ्यात प्रियजनांचा शोध सुरु

मुंबई : पापुआ न्यु गिनीवर भूस्खलनाचे मोठे संकट ओढावले आहे. भूस्खलनात २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याचे सांगितले जातेय. बचावपथक लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याच्या कामात व्यस्त आहेत.

पापुआ न्यू गिनीच्या सरकारी आपत्ती केंद्राने अशी माहिती दिली की, भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे ६०० किलोमीटर उत्तर-पश्चिमेस असलेल्या एन्गा प्रांतातील एका गावात गेल्या शुक्रवारी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक घरांमध्ये झोपलेले लोक गाडले गेले आहेत. या दुर्घटनेनंतर लगेचच संयुक्त राष्ट्राने सांगितले की, १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा. नंतर हा आकडा ६७० असल्याचे सांगण्यात आले.
विमानाला हादरे; १२ प्रवासी जखमी, ‘कतार एअरवेज’च्या दोहा-डब्लिन विमानातील घटना

भूस्खलन संथ गतीने पुढे जातंय तशी परिस्थिती अस्थिर होतेय

राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यवाहक संचालक लुसेट लासो माना यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोक जिवंत गाडले गेले आणि इमारती आणि शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्याचा देशाच्या आर्थिक घडीवर मोठा परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, भूस्खलन संथ गतीने पुढे जात असल्याने परिस्थिती अस्थिर झाली आहे, जी लोकांसाठी धोक्याची ठरू शकते. तसेच दरड कोसळल्यामुळे अनेक भागांना जोडणारे रस्तेही बंद झाले आहेत. पापुआ न्यू गिनीमध्ये सुमारे १० दशलक्ष लोक राहतात. खराब रस्ते आणि दरड कोसळल्यामुळे बचावपथकांना बाधित भागात पोहोचणे कठीण झाले आहे.
Indigo Flight: इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ; कोणी मारल्या उड्या तर कोणी…

संशोधक सांगतात दबल्या गेलेल्या लोकांना शोधणे आव्हानात्मक

सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक पियरे रोगनन म्हणाले की, भूस्खलनानंतर लोकांना शोधणे खूप आव्हानात्मक असतं आणि भूस्खलनामुळे कोसळलेल्या इमारती आणि लोक अनेक मीटर खाली दबले जाऊ शकतात. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलन कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ॲडलेड विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ॲलन कॉलिन्स सांगतात, ‘भूस्खलन थेट भूकंपामुळे झालेले नाही. हा अतिशय पावसाळी भाग होता, त्यामुळे येथे असे घडले असावे. तर डोंगरउतार बनवणारे खडक पावसामुळे कमकुवत झाले असावेत.’

Source link

disasteremergency incidentinternational newsnatural disasterpapuapapua new guinea landslideआपत्ती व्यवस्थापननैसर्गिक आपत्तीपापुआ न्यु गिनीभूस्खलनविदेश वृत्त
Comments (0)
Add Comment