आता ओपनएआयच्या चॅट टूल ChatGPT 4o चं एक उत्तर सोशल मीडियावर वायरल होत आहे. या उत्तरात चॅटजीपीटीच्या लेटेस्ट व्हर्जननं, ‘आगामी काळात कोणत्या नोकऱ्यांमध्ये माणसांची जागा घेईल?’ या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना एआयनं 15 अशी कामे सांगितली आहेत जी एआय मानवापेक्षा चांगली करू शकतो. त्यामुळे कंपन्या या कामांसाठी माणसांच्या ऐवजी एआयची निवड करू शकतात.
एका एक्स युजरनं एक लिस्ट शेयर केली आहे जी ChatGPT 4oच्या मदतीनं तयार करण्यात आली आहे. ChatGPT 4o नं या लिस्टमध्ये त्या नोकऱ्यांची नावे दिली आहेत ज्यांची जागा एआय घेईल. ChatGPT 4oनुसार पहिली नोकरी डेटा एंट्री क्लर्कची असेल जी एआयमुळे धोक्यात येईल.
एक्सपर्टनुसार, डेटा एंट्रीचं काम एआय माणसांच्या तुलनेत चांगलं आणि फास्ट करू शकतं. तसेच टेली मार्केटर, कस्टमर केयर, मार्केट रिसर्च आणि कॉपी राइटरची नोकरी ChatGPT 4o मुळे संपुष्टात येईल. त्याचबरोबर ग्राफिक्स डिजाइनरची नोकरी देखील ChatGPT 4o मुळे धोक्यात आहे. ChatGPT 4o च्या मते न्यूज रिपोर्टर म्हणजे पत्रकारांची नोकरी देखील एआय घेईल.
ChatGPT 4o चे फीचर्स
GPT 4o मधील ‘o’ म्हणजे ओमनी-मॉडेल हे GPT-4 टर्बो मॉडेलच्या तुलनेत दुप्पट वेगवान आहे. यातील रिस्पॉन्सची लॅटन्सी सुधारण्यात आली आहे. त्यामुळे GPT-4o आता रिअल टाइममध्ये प्रश्नांची उत्तरे देऊ शकतं. भावनिक आवाजांचा सपोर्ट असल्यामुळे GPT-4o माणसांप्रमाणे बोलू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रियांमध्ये व्हॉइस मॉड्युलेशन पाहायला मिळतात. तसेच हे AI माणसाच्या भावनाही ओळखू शकते आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकते.