हवामान विभागाने सांगितले की, नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजापेक्षा एक दिवस अगोदर गुरुवारी ३० एप्रिलला केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्येकडील काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर आता नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही सुरळीत होत असल्याने मान्सूनच्या केरळमधील आगमनासाठी ही पोषक स्थिती आहे.
दरम्यान काही भागांत ३१ तारखेला मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत होते. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या ईशान्येकडील राज्यांत ५ जूनला मान्सूनचा अंदाज असल्याचे सांगितले होते.
हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार मान्सून वेळेच्या आधी हजेरी लावणार? याबदद्ल देखील चर्चा होत आहेत. यावर आता हवामान तज्ज्ञांनी काही कारणं स्पष्ट केली आहेत.
रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह वेगात
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रेमल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला गेला त्यामुळे ईशान्येत मान्सून लवकर दाखल होण्याचे हे एक कारण असू शकते. याआधीही ईशान्येकडील राज्यांतच रेमल चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
रेमलचा ईशान्येकडील राज्यांना मोठा फटका
चक्रीवादळ रेमलमुळे ईशान्येकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याचा मोठा फटका देखील लोकांना क्रियाकलापांना बसला. भूस्खलनासारख्या घटना घडल्या, ज्यामध्ये ३० लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक बेपत्ता देखील आहेत. यासोबतच काही घरं देखील गाडले गेले आहेत.
अशीच काहीसी स्थिती मिझोराम मध्ये देखील पाहायला मिळाली. मिझोरामच्या आईजोल जिल्ह्यात भूस्खलनामुळे मृतांच्या संख्येने २९ चा आकडा गाठला. याचबरोबर आसाममध्ये ४, नागालँडमध्ये ४ आणि मेघालयमध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला.