या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,”२०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीतील जीडीपी वाढीची आकडेवारी आपल्या अर्थव्यवस्थेची मजबूत गती दर्शवतो जी आणखी वेगवान होत आहे. यासाठी आपल्या देशातील कष्टाळू लोकांचे आभार. २०२३-२४ या वर्षातील ८.२ टक्क्यांची वाढ हे भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे उदाहरण देते. मी म्हटल्यानुसार, हा येणाऱ्या गोष्टींचा ट्रेलर आहे.”
पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटला दुजोरा देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देखील ट्वीट करत देशाच्या हा वाढता विकासदर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातही पहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान देशात सध्या अंतिम टप्प्यातील निवडणूका १ जूनला होत असून यामध्ये पंतप्रधान मोदी लढत असलेल्या उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे.निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सध्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे गुरुवारपासून ध्यानसाधना करत आहेत. ४ जून रोजी देशातील लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील.
अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होण्याच्या आधी उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे निवडणूक ड्यूटीवर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मृत्यू झालेल्यांपैकी ७ होमगार्डचे जवान आहेत. तर अन्य ३० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांना तापमान वाढीचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.