OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 11R ची डिजाइन मोठ्याप्रमाणात OnePlus 11 सारखीच आहे. याची बिल्ड देखील चांगली आहे आणि मागील बाजूस मॅट फिनिश मिळते. याची स्क्रीन कर्व्ड आहे जी अनेकांना आवडू शकते कारण ही खूप स्टाइलिश डिजाइन आहे. 11R मध्ये 6.74 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. हिचे रिजॉल्यूशन 1240 x 2772 पिक्सल आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आहे. उन्हात देखील फोन स्क्रीन नीट दिसावी म्हणून याची ब्राइटनेस 1450 निट्स पर्यंत जाऊ शकते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे जो वेगवान आहे आणि तुमच्या दैनंदिन कामांसाठी पुरेसा आहे जरी हा सर्वात नवीन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर नसाल तरी.
हे देखील वाचा:
फोटोग्राफीसाठी OnePlus 11R मधील मेन कॅमेरा चांगला आहे. तुम्ही सहज चांगले फोटो घेऊ शकता. कॅमेरा सेटअपमध्ये 50 MP चा मेन कॅमेरा सेन्सर आहे, सोबत 8 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. तसेच 2 MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फोनच्या फ्रंटला 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरबॅकअपसाठी 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 100 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.