२०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलने काय सांगितलं होतं? कुणाची भविष्यवाणी खरी झाली होती?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ आता अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यासाठी आज (शनिवार) मतदान सुरू आहे. सातव्या टप्प्यातील मतदानासह लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची शनिवारी सायंकाळी सहा वाजता सांगता होत आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांचे लक्ष मतदानोत्तर चाचण्यांकडे (एक्झिट पोल) लागले आहे. मतदान संपताच अधिकृतपणे एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरूवात होईल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल ४ जून रोजी लागणार आहेत. पण जनतेचा आशीर्वाद कोणाला मिळेल, याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांतून कळणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज बरोबर येईलच असे नाही, परंतु त्यातून सामान्यत: अंदाज लावता येऊ शकतो. असे अनेक प्रसंग आहेत, जेव्हा चाचण्यांचे अंदाज बरोबर आणि चुकीचेही आलेले आहेत.

वास्तविक, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मतदारांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे कुणाचा विजय होईल किंवा कुणाच्या वाट्याला पराभव येईल, याचा अंदाज लावला जातो. २०२४ लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे यायला सुरूवात होईल. संध्याकाळी ६ वाजता मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे येतील.
Exit Poll Stock Market Prediction: एक्झिट पोलनंतर शेअर बाजार कोसळतो की उसळतो? निकालाआधी काय आहेत संकेत

यंदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यास उत्सुक आहे. तर इंडिया आघाडी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.


पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काय झाले होते? त्यावेळी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये साधारण काय चित्र होते? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरले होते. २०१९ मध्ये, बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली होती. २०१९ मध्ये मतमोजणी झाली तेव्हा अंतिम निकालही थोड्याफार फरकाने सारखेच होते.

एक्झिट पोल एजन्सी NDA UPA Others
India Todays-Axis My India 339-365 77-108 82
ABP-CSDS 277 130 135
C-Voter 287 128 127
India TV-CNX 300-310 120-125 122-130
News 24-Todays Chanakya 350-364 95-104 97-107
News X-Neta 242 164
Times Now- VMR 306 132 104
News 18-IPSOS 336 82 124
India News_Poll Start 287 128 127

२०१४ आणि १०१९ मध्ये काय झाले होते?

२०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५४३ पैकी ३५३ जागा जिंकल्या होत्या. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पूर्ण बहुतमाने सत्तेवर आले होते. एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, २०१९ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला केवळ ९१ जागा जिंकण्यात यश आले होते.

Source link

Exit pollsExit polls 2024lok sabha electionlok sabha election 2024Lok Sabha Election Exit pollsएक्झिट पोलएक्झिट पोल बातम्याएक्झिट पोल २०२४
Comments (0)
Add Comment