टाइम्स नाऊ नवभारत ईटीजी
या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला ३५८ जागा, इंडिया आघाडीला १३२ जागा तर अन्य पक्षांना ५३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एबीपी- सी व्होटर
या एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करेल. एनडीएला ३५३ ते ३८३ जागा, इंडिया आघाडीला १५२-१८२ जागा तर अन्यला ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
एक्सिस माय इंडिया
आजतक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळू शकतील. या सर्व्हेनुसार भाजप ३६१ ते ४०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील असे म्हटले आहे.
Matrizeनुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज Matrizeने वर्तवला आहे.
PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला ३५९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला १५४ जागा मिळतील. अन्यला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जनन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३७७, इंडिया आघाडीला १५१ तर अन्यला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
D-Dynamicsच्या एक्झिट पोलनुसार NDA आघाडीला देशात ३७१ तर इंडिया आघाडीला १२५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना ४७ जागा मिळतील असे म्हटले आहे.
नॅशनल न्यूजच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि मित्र पक्षांना ३४२ ते ३७८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. इंडिया आघाडीला १५३ ते १६९ जागा मिळतील तर अन्यला २१ ते २३ जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय.