Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha Election 2024 Exit Poll: मोदींची हॅटट्रिक!उत्तर ते दक्षिण भाजपचा झेंडा; इंडिया आघाडीचे दावे फोल, महाएक्झिट पोल एका क्लिकवर

11

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या मधून व्यक्त करण्यात आला आहे. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच बरोबर इंडिया आघाडीचे सर्व दावे एक्झिट पोलनी फोल ठरवले आहेत. अधिक तर राज्यांत भाजपची कामगिरी दमदार झाल्याचे म्हटले आहे. काही एक्झिट पोलनी भाजपला ३५० हून अधिक जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. भाजपला सर्वाधिक फायदा दक्षिण भारतात झाल्याचे दिसत आहे. केरळपासून तेलंगणापर्यंत भाजपच्या जागा वाढल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेस पेक्षा अधिक जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. राजधानी नवी दिल्लीत भाजपने क्लीन स्विप केल्याचा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ नवभारत ईटीजी

या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला ३५८ जागा, इंडिया आघाडीला १३२ जागा तर अन्य पक्षांना ५३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Narendra Modi: मतदारांचे आभार तर विरोधकांची धुलाई; एक्झिट पोलनंतर पंतप्रधान मोदींनी दिली मोठी प्रतिक्रिया

एबीपी- सी व्होटर

या एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करेल. एनडीएला ३५३ ते ३८३ जागा, इंडिया आघाडीला १५२-१८२ जागा तर अन्यला ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्सिस माय इंडिया

आजतक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळू शकतील. या सर्व्हेनुसार भाजप ३६१ ते ४०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील असे म्हटले आहे.

Matrizeनुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज Matrizeने वर्तवला आहे.
Uttar Pradesh Exit Polls: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बंपर लॉटरी; इंडिया आघाडीला मोठा धक्का, एक्झिट पोलचा निकाल जाहीर

PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला ३५९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला १५४ जागा मिळतील. अन्यला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जनन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३७७, इंडिया आघाडीला १५१ तर अन्यला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

D-Dynamicsच्या एक्झिट पोलनुसार NDA आघाडीला देशात ३७१ तर इंडिया आघाडीला १२५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना ४७ जागा मिळतील असे म्हटले आहे.

नॅशनल न्यूजच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि मित्र पक्षांना ३४२ ते ३७८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. इंडिया आघाडीला १५३ ते १६९ जागा मिळतील तर अन्यला २१ ते २३ जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.