Uttar Pradesh Exit Polls: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बंपर लॉटरी; इंडिया आघाडीला मोठा धक्का, एक्झिट पोलचा निकाल जाहीर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आता एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाच्या आधी आज विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून करण्यात आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ६१.११, दुसऱ्या टप्प्यात ५५.१९, तिसऱ्या टप्प्यात ५७.५५, चौथ्या टप्प्यात ५८.२२, पाचव्या टप्प्यात ५८.०२, सहाव्या टप्प्यात ६३.३७ टक्के मतदान झाले होते. सातव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला उत्तर प्रदेशमध्ये ६५ जागा मिळाल्या होत्या. बसपाला १० जागा तर सपाला ५ जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती.
ठाकरेंची मशाल पेटणार, पवारांच्या तुतारीचा आवाज होणार, काँग्रेसलाही अच्छे दिन, एबीपी-टीव्ही ९ च्या पोलमध्ये काय?

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. याचे कारण म्हणजे या राज्यातील असलेल्या लोकसभेच्या ८० जागा होय. Matrizeच्या एक्झिट पोल नुसार २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश मध्ये बंपर लॉटरी लागणार असल्याचे दिसते. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला ६९ ते ७४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये बसपला एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे. Matrizeनुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज Matrizeने वर्तवला आहे.

Matrizeचा एक्झिट पोल २०२४

भाजप + NDA = ६९ ते ७४
इंडिया आघाडी = ६ ते ११

इंडिया न्यूज डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ६९ जागा तर इंडिया आघाडीला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर मुख्यमंत्री योगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या १० वर्षात भारत बदलत आहे. तर गेल्या सात वर्षात डबल इंजिन सरकारने नवा उत्तर प्रदेश पाहायला मिळत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Source link

80 seats of uttar pradeshloksabha election 2024see uttar pradesh exit pollsuttar pradesh exit pollsuttar pradesh exit polls 2024उत्तर प्रदेश एक्झिट पोलएक्झिट पोललोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment