Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीचा निकाल आज; कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या आणि किती टक्के मते मिळाली, जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल आज मंगळवारी ४ जून रोजी जाहीर होत आहेत. गेल्या १० वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. आता पक्ष हॅटट्रिकच्या प्रयत्नात आहे. अशात भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष तसेच विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी किती जागा लढवल्या आणि त्यांना किती टक्के मते मिळाली हे जाणून घेऊयात.लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान झाले होते. २०१९च्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपला ३०३ जागा आणि ३७.३० टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ५२ जागा आणि १९.४६ टक्के मिळाली होती. सत्ताधारी भाजपने देशातील ४४१ मतदारसंघात स्वत:चे उमेदवार उभे केले आहेत. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ३२८ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.
पक्ष लढवलेल्या जागा जिंकलेल्या जागा मतांची टक्केवारी २०१९च्या तुलनेत मते वाढली/कमी झाली
भाजप ४४१
काँग्रेस ३२८
तेलगू देशम पार्टी १७
जनता दल(संयुक्त) १६
शिवसेना (ठाकरे) २१
शिवसेना (शिंदे) १५
राष्ट्रवादी (अजित पवार) ०५
राष्ट्रवादी (शरद पवार) १२
समाजवादी पार्टी ७१
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ५२
तृणमूल काँग्रेस ४८
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ३२
भारतीय कम्युनिस्ट पार्टी २८
राष्ट्रीय जनता दल २८
आम आदमी पार्टी २२
द्रमुक २१
YSR काँग्रेस २५
बिजू जनता दल २१

लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले असले तरी १९९६ नंतर पक्षाने प्रथमच काश्मीरमध्ये एकही उमेदवार दिलेला नाही. केंद्र सरकारने २०१९ साली काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर येथे पक्षाची लोकप्रियता कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा काँग्रेसने लढवल्या आहेत.काँग्रेसने ३२८ उमेदवार दिले असून त्यानंतर माकपाने ५२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांवर आणि अन्य राज्यात ६ उमेदवार उभे केले आहेत.

Source link

BJP percentage of votesCongress percentage of voteslok sabha election 2024Lok Sabha Election 2024 resultslok sabha election 2024 results todaypercentage of votes lok sabha election 2024Who got how many seats in the Lok Sabha 2024लोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणू्क कोणाला किती जागा मिळाल्या
Comments (0)
Add Comment