thackeray and rane: आज चिपी विमानतळाचे उद्घाटन; मुख्यमंत्री-राणे येणार एकाच व्यासपीठावर

हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज होणार उद्घाटन.
  • या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार.
  • विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर यांना निमंत्रण नसल्याने त्यांचा कार्यक्रमावर बहिष्कार.

सिंधुदुर्ग: आज बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळाचे (Chipi Airport) उद्घाटन होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वादामुळे हे विमानतळ चर्चेत आले होते. विमानतळाच्या उद्घाटनासंदर्भात दोन्ही बाजूंकडून विविध वक्तव्ये केली होती. शिवाय राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांनतर राणे यांना अटक केल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना असा वाद तीव्र बनला होता. यामुळे विमानतळाचा उद्घाटनाचा कार्यक्रम कसा पार पडेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला नारायण राणे यांनी निमंत्रण पत्रिकेत देण्यात आलेले स्थान आणि नावाचा लहान आकार याबाबत नाराजी व्यक्त केली असली, तरी देखील ते आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येत आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर दिसणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे. (cm uddhav thackeray and narayan rane coming on the same platform today on the occasion of inauguration of chipi airport)

क्लिक करा आणि वाचा- थोडा दिलासा, थोडी चिंता!; राज्यात करोनाची ‘अशी’ आहे आजची स्थिती!

राज्य सरकारने विमानतळ उद्घाटनाच्या छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी छापले आहे. शिवाय हे नाव दोन्ही नेत्यांच्या नावाहून लहान आकारात छापण्यात आल्याचे सांगत नारायण राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही कोती मनोवृत्ती असल्याचे राणे यांनी म्हटले असले तरी देखील कोणताही वाद होईल असे वक्तव्य राणे यांनी टाळले आहे. यामुळे राणे उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात असून ते मुख्यमंत्र्यांसोबच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी

भाजपचा मात्र बहिष्कार

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही काल उशिरापर्यंत मिळालेले नव्हते. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चिपी विमानतळाच्या बांधकामात योगदान आहे. असे असूनही फडणवीसांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. हे पाहता हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचे दरेकर म्हणाले. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाही हे तर सोड, परंतु आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नसल्याचेही ते म्हणाले. ही परिस्थिती पाहता त्यामुळे आता उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारायण राणे कोणता सूर लावणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Source link

Chipi airportcm uddhav thackerayNarayan Ranethackeray and raneकेंद्रीय मंत्री नारायण राणेचिपी विमानतळ
Comments (0)
Add Comment