Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज होणार उद्घाटन.
- या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार.
- विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर यांना निमंत्रण नसल्याने त्यांचा कार्यक्रमावर बहिष्कार.
क्लिक करा आणि वाचा- थोडा दिलासा, थोडी चिंता!; राज्यात करोनाची ‘अशी’ आहे आजची स्थिती!
राज्य सरकारने विमानतळ उद्घाटनाच्या छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी छापले आहे. शिवाय हे नाव दोन्ही नेत्यांच्या नावाहून लहान आकारात छापण्यात आल्याचे सांगत नारायण राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही कोती मनोवृत्ती असल्याचे राणे यांनी म्हटले असले तरी देखील कोणताही वाद होईल असे वक्तव्य राणे यांनी टाळले आहे. यामुळे राणे उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात असून ते मुख्यमंत्र्यांसोबच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी
भाजपचा मात्र बहिष्कार
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही काल उशिरापर्यंत मिळालेले नव्हते. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चिपी विमानतळाच्या बांधकामात योगदान आहे. असे असूनही फडणवीसांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. हे पाहता हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचे दरेकर म्हणाले. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाही हे तर सोड, परंतु आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नसल्याचेही ते म्हणाले. ही परिस्थिती पाहता त्यामुळे आता उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारायण राणे कोणता सूर लावणार हे पाहणे महत्वाचे आहे.