मंचावरील नेत्यांच्या भाषणादरम्यान योगी गंभीर मुद्रेत दिसले. त्यांच्या शेजारी बसलेले इतर नेतेही निराश दिसत होते. २०१९ च्या तुलनेत युपीमध्ये भाजपची कामगिरी निराशाजनक होती, त्याचा परिणाम दिसून येत असल्याची चर्चा लोक करत आहेत. यावेळी भाजपने उत्तर प्रदेशात २९ जागा गमावल्या आहेत. अयोध्या असो की पूर्वांचल, प्रत्येक क्षेत्रात त्यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांनाही आपली जागा वाचवण्यात अपयश आले. यामध्ये महेंद्रनाथ पांडे, साध्वी निरंजन ज्योती आदी नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर सर्वात मोठी चर्चा फैजाबाद मतदारसंघातील पराभवाची आहे. राम मंदिर बांधूनही अयोध्येतील जनतेने तिथे भाजप उमेदवाराला निवडले नाही, असे लोक म्हणत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सीएम योगी यांनी राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात ८४ वेळा अयोध्येला भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकवेळा अयोध्येला आले. येथे मोठा प्रचारही करण्यात आला. पण, त्याचा काही परिणाम निवडणुकीत दिसला नाही. सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे मंचावरून भाषण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावरील भाव थोडेसे बदलले, पण नंतर ते पुन्हा पूर्वीसारखेच झाले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने फक्त १२ जागा जिंकल्या आहेत.