युजर्सना पूर्ण कराव्या लागतील या अटी
मीडिया रिपोर्टनुसार युजर्सना आपण कायद्याने सिंगल असल्याचं सिद्ध करण्यासाठी कागदपत्र सबमिट करावे लागतील. त्यांना एका लेटरवर सही करावी लागेल, ज्यात लिहलं असेल की ते लग्नासाठी तयार आहेत. जपानी डेटिंग अॅप्सवर आपली कमाई सांगणे सामान्य आहे, परंतु टोकियो अॅपमध्ये अॅन्युअल इनकम सिद्ध करण्यासाठी टॅक्स सर्टिफिकेट आवश्यक असेल. टोकियो अॅपसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा भाग म्हणून युजरची ओळख पटवण्यासाठी एक इंटरव्यू आवश्यक असेल. हे अॅप गेल्यावर्षी पासून फ्री टायलवर सुरु आहे.
नवीन अॅपची जबाबदारी सांभाळणार्या टोकियो सरकारच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की लग्नासाठी 70 टक्के इच्छुक लोक कोणत्याही इव्हेंट किंवा अॅपशी जोडले जाऊन जोडीदाराचा शोध घेण्यात सक्रिय नाहीत. आम्ही त्यांना जोडीदार शोधण्यासाठी मदत करू पाहत आहोत.”
इलॉन मस्कला आवडली आयडिया
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी देखील जपानच्या या मोहिमेचे कौतुक केले आहे. याबाबत एका ट्वीटला उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की त्यांना बरं वाटत आहे की जपाननं याचे महत्व ओळखले आहे. जर ठोस कारवाई केली गेली नाही तर जपान (आणि इतर अनेक देश) गायब होतील.
जपानमध्ये जन्मदरात घट
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी जपानमध्ये नवीन जन्मलेल्या अर्भकांच्या तुलनेत दुप्पट मृत्यूंची नोंद झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार गेली आठ वर्ष जन्मदरात 5.1 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्यावर्षी 7,58,631 मुलं जन्माला आली तर मृतांची संख्या 1,590,503 होती.