जम्मू विभागातील उधमपूर येथे सर्वाधिक १२,९३८ ‘नोटा’ मते मिळाली. तेथून भाजपचे उमेदवार जितेंद्र सिंह विजयी झाले. उधमपूरमधून ११ पैकी नऊ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा अधिक मते मिळाली. शेजारच्या जम्मू मतदारसंघात ४,६४५ मतदारांनी ‘नोटा’ चा वापर केला. यापैकी १८ उमेदवारांना वैयक्तिकरित्या मिळवलेल्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक आहेत. भाजपच्या जुगल किशोर यांनी हा मतदारसंघ राखला आहे.
श्रीनगरच्या जागेवर ‘नोटा’ च्या मतांची संख्या ५,९९८ होती. मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी बहुतेक १८ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली. अनंतनाग-राजौरी मतदारसंघात ६,२२३ मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती दिली. या जागेवर वीस उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी नऊ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली.
बारामुल्ला येथे ४,९८४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय वापरला. येथे २२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ उमेदवारांना कमी मते मिळाली. दरम्यान, ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा भाग असलेल्या लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत कलम ३७० रद्द केले. तेव्हा ‘नोटा’ फक्त ९१२ मतदारांनी पसंती दिली. येथे फक्त तीन उमेदवार रिंगणात होते. त्या सर्वांना ‘नोटा’ पेक्षा अधिक मते मिळाली.